मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: कंटाळून वयाच्या 21व्या वर्षी तिनं सोडली नोकरी; आज कमवतेय लाखो रुपये

Success Story: कंटाळून वयाच्या 21व्या वर्षी तिनं सोडली नोकरी; आज कमवतेय लाखो रुपये

सध्या ही महिला असं काही काम करते, की त्याच्या जोरावर महिन्याला लाखो रुपये कमावते.

सध्या ही महिला असं काही काम करते, की त्याच्या जोरावर महिन्याला लाखो रुपये कमावते.

सध्या ही महिला असं काही काम करते, की त्याच्या जोरावर महिन्याला लाखो रुपये कमावते.

जगात नोकरीत (latest Jobs) समाधानी असणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. जे काम करत असतात त्यातून ते आनंद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात; पण विचित्र वरिष्ठ, कमी वेतन किंवा कामाची वाईट संस्कृती यापैकी एका कारणामुळं काही कालावधीनंतर ते चिंताग्रस्त होऊ लागतात. यामुळे या लोकांच्या मनात नोकरी सोडण्याचा निश्चय (Resign from jobs) पक्का होतो; मात्र पैशांची गरज असल्यामुळे ते नोकरी सोडू शकत नाहीत. परंतु एक महिला अशी आहे, की तिनं ही जोखीम वयाच्या 21 व्या वर्षी घेतली. तिने या वयात नोकरी सोडून निवृत्ती (Retirement) पत्करली. सध्या ही महिला असं काही काम करते, की त्याच्या जोरावर महिन्याला लाखो रुपये कमावते.

21 वर्षांची लिली जारेम्बा विद्यापीठातलं शिक्षण सोडून नोकरी करू लागली; मात्र नोकरीत 10 तास काम करावं लागत असल्यानं ती या सगळ्या प्रकाराला कंटाळली आणि तिनं नोकरी सोडून दिली. लिलीनं कमी वयात नोकरी सोडली असली तरी आता ती वर्षाला 53 लाखांपेक्षा अधिक कमावते. 19 वर्षांची लिली एका सुशी रेस्टॉरंटमध्ये नोकरी करू लागली. तिथं तिला 10 तास काम करावं लागे. साफसफाईचं कामही ती करत असे. याचदरम्यान एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनी (Financial Investment Company) बचतीविषयी आणि पैशांच्या योग्य नियोजनाविषयी प्रशिक्षण देत असल्याची माहिती तिला मिळाली. या कंपनीकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर लिलीनं नोकरी सोडली. त्यानंतर दोन वर्षं कठोर मेहनत करून तिने पैशांची गुंतवणूक (Investment) सुरू केली. या काळात तिला नुकसान सोसावं लागलं. परंतु नंतर फायदा अधिक झाला.

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

`द सन`ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकताच लिलीनं एक व्हिडिओ शेअर केला. यात तिनं नोकरी सोडल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), स्टॉक्स (Stocks) आणि क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) गुंतवणूक सुरू केल्याचं सांगितलं आहे. याशिवाय तिने अनेकांना गुंतवणुकीविषयी माहिती देऊन चांगली कमाई केली. आता तिचं उत्पन्न चांगलंच वाढलं आहे. आता ती केवळ कमिशनवर सुखवस्तू आयुष्य जगत आहे. तसंच ती लोकांना गुंतवणुकीचा सल्लाही देत आहे. भरपूर उत्पन्न मिळावं यासाठी लिली लोकांना 3 टिप्स देते.

प्रत्येकानं स्वतःच्या योग्यतेनुसार नोकरी शोधली पाहिजे.तुम्ही सर्वांत मेहनती कर्मचारी असाल, तरी नोकरी योग्य पद्धतीची नसेल, तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही साध्य करू शकत नाही. दुसरी गोष्ट, अशी की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एखादा चांगला सल्लागार शोधणं आवश्यक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करावं आणि त्याच्याप्रमाणे मेहनत सुरू करावी. यामुळे तुम्ही लवकर यश संपादन करू शकाल. ऑनलाइन इन्कमचं (Online Income) साधन शोधावं. फॉरेक्स, क्रिप्टो, अॅफिलिएट मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही लवकर अपेक्षित कमाई करू शकाल, असं ती सांगते.

First published:

Tags: Success story