मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Wipro Recruitment: कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवारांनो, Job चा गोल्डन चान्स सोडू नका; लगेच करा अर्ज

Wipro Recruitment: कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवारांनो, Job चा गोल्डन चान्स सोडू नका; लगेच करा अर्ज

Wipro कंपनीत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

Wipro कंपनीत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

क्लायंटना सपोर्ट करण्यासाठी हे फायनान्स प्रोफेशनल्स टेक्निकल प्रोफेशनल्ससोबत काम करणार आहेत. क्लायंट सपोर्ट सुधारण्यासाठी आर्थिक व्यावसायिक कर्मचारी यांच्यातील संपर्क म्हणून कार्य करणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal
गुडगाव, 05 डिसेंबर: नामांकित कंपनी Wipro त्यांच्या फायनान्स डोमेनसाठी (Wipro Recruitment for Financial Domain) गुडगाव स्थानावर अनुभवी डेटा विश्लेषक (Wipro jobs for Data Analyst) शोधत आहे. क्लायंटना सपोर्ट करण्यासाठी हे फायनान्स प्रोफेशनल्स टेक्निकल प्रोफेशनल्ससोबत काम करणार आहेत. क्लायंट सपोर्ट सुधारण्यासाठी आर्थिक व्यावसायिक कर्मचारी यांच्यातील संपर्क म्हणून कार्य करणार आहेत. चला तर मग जाणून घेउया या भरतीबाबत (Wipro Recruitment for Financial professionals). ही असणार उमेदवारांसाठी पात्रता (Eligibility for Wipro recruitment)  या जॉब्स साठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी अकाउंटिंग, फायनान्स किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही गुण असणं आवश्यक (Skills for Wipro recruitment) यूएस GAAP चे ज्ञान आर्थिक डोमेनमध्ये काम करण्याचा अनुभव / आर्थिक अटींचे चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. SQL वापरून डेटाबेसमधील डेटाची क्वेरी आणि विश्लेषण करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. Excel चं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदारांकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. (लिखित आणि मौखिक) उमेदवारांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आणि तांत्रिक आणि कार्यात्मक कौशल्ये वाढवण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. मजबूत संघ नेतृत्वासह सेल्फ-स्टार्टर, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, बहु-कार्य आणि वेगाने बदलणाऱ्या वातावरणात संघासोबत काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' मोठी IT कंपनी करणार तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा संपूर्ण माहिती अशी असेल जॉब प्रोफाइल उमेदवारांनी फायनान्शिअल सपोर्ट देणं आवश्यक आहे. Technology team आणि business stakeholders चं एकमेकांशी संभाषण घडवून आणणं आवश्यक आहे. कंपनीचा बिझिनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अंतर्गत सुधारणांसाठी क्षेत्रे ओळखण्यात आणि सर्जनशील, सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्यात सक्षम उमेदवार असणं आवश्यक. आर्थिक अहवाल प्रणालीसाठी भविष्यातील सुधारणा आणि/किंवा एकत्रीकरण प्रकल्पांच्या समन्वय, चाचणी आणि अंमलबजावणीमध्ये योगदान देणं आवश्यक. IT क्षेत्रातील या कंपन्यांमध्ये मोठी पदभरती HCL Technologies ने नमूद केले आहे की ते सुमारे 60% नवीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल. आणि चालू आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 22,000 नवीन नोकर भरती करण्याची योजना आहे. दुसरीकडे, TCS 15,000 ते 18,000 महिला कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची योजना आखत आहे. त्यात L&T नंही महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता Capgemini 65,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
First published:

पुढील बातम्या