मुलींना IAS करणार का? समाजाचे टोमणे झाले खरे; पाचही जणींनी वडिलांची मान उंचावली

मुलींना IAS करणार का? समाजाचे टोमणे झाले खरे; पाचही जणींनी वडिलांची मान उंचावली

आजही अनेक ठिकाणी मुली झाल्या तर समाजाकडून टोमणे मारले जातात. 'मुली काय दुसऱ्यांच्या घरी जाणार' असं म्हणणाऱ्यांना हा चांगला धडा आहे

  • Share this:

बरेली, 12 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली जिल्ह्यातील फरीदपूर तहसील अंतर्गत चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांच्या घरात पहिली मुलगी जन्माला आली. मग एकेक करून पाच मुली झाल्या. यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. मात्र तेव्हा दुसरीकडे लोकांनी 5 मुली म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, आता त्यांना आयएएस करणार ?  मात्र लोकांचे टोमणे मात्र खरे झाले. चंद्रसेन सागरच्या पाच मुलींपैकी तीन मुलींनी यूपीएससीची परीक्षा दिली. दोन मुली आज आयएएस आहेत तर तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. इतर दोन मुलीही इंजिनिअर आहेत.

चंद्रसेन सागर म्हणाले की, मुलींचा अधिकारी होण्यासाठी त्यांची आई मीना देवीने खूप मेहनत घेतली. त्यांच्या मुलींचे शिक्षण बरेली येथील सेंट मारिया कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी उर्वरित अभ्यास उत्तराखंड, अलाहाबाद आणि दिल्ली येथून पूर्ण केला. तिन्ही बहिणींनी दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी केली. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित सागरने दुसर्‍या प्रयत्नात 2009 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. यानंतर ती सहआयुक्त म्हणून कस्टम विभागात मुंबई येथे रुजू झाली. यादरम्यान आंध्रप्रदेशातील विजयवाड येथे तिचं लग्न झालं.

तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर 2015 मध्ये, दुसरी मुलगी अर्पितला स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळालं. सध्या ती वलसाडमधील डीडीओ येथे तैनात आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मुली अश्विनी आणि अंकिता अभियंता आहेत. त्या सध्या मुंबई व नोएडा येथे खासगी नोकरी करत आहे.

'मामांनी खूप मदत केली आणि ...'

चंद्रसेना आणि मीना देवींची सर्वात लहान मुलगी आकृति सागरने 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं. सध्या ती जल मंडळाच्या संचालकपदावर कार्यरत आहे. चंद्रसेन यांच्या मुलींनी सांगितले की, त्यांना यूपीएससीची तयारी करण्यासाठी मामाकडून प्रेरणा मिळाली. मामा अनिल कुमार हे पश्चिम बंगाल केडरचे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. या मुलींचे स्वप्न त्यांच्या मामासारखे एक महान अधिकारी होण्याचे होते. यूपीएससी परीक्षेच्या तयारी दरम्यान त्यांचे काका अनिल कुमार यांनीही खूप सहकार्य केले

Published by: Meenal Gangurde
First published: December 12, 2020, 4:26 PM IST
Tags: upsc exam

ताज्या बातम्या