मराठी बातम्या /बातम्या /करिअर /शिक्षणात मुलींपेक्षा मुलं मागे का असतात? यावर विद्यापीठांनी संशोधन करावं; राज्यपालांचे आदेश

शिक्षणात मुलींपेक्षा मुलं मागे का असतात? यावर विद्यापीठांनी संशोधन करावं; राज्यपालांचे आदेश

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलं अभ्यासात मुलींच्या मागे का आहेत? यावर विद्यापीठांनी संशोधन करायला हवे, असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलं अभ्यासात मुलींच्या मागे का आहेत? यावर विद्यापीठांनी संशोधन करायला हवे, असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलं अभ्यासात मुलींच्या मागे का आहेत? यावर विद्यापीठांनी संशोधन करायला हवे, असं म्हटलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी:  सध्याच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने अनेक क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतात. अनेक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा चांगलं काम करताना दिसतात. शिक्षणातही मुली मुलांपेक्षा चांगले गुण मिळवतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर बोर्डाचे निकाल लागले की मुलींनींच बाजी मारल्याचं दिसून येतं. यामुळेच आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलं अभ्यासात मुलींच्या मागे का आहेत? यावर विद्यापीठांनी संशोधन करायला हवे, असं म्हटलं आहे. यासंदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी आगामी काळात सर्व मेडल मुलीच जिंकतील, अशी शक्यता वर्तवली. तसेच मुलींपेक्षा मुलं का मागे पडतात, यावर विद्यापीठांनी संशोधन करायला हवे, असं त्या म्हणाल्या. त्या बलिया येथील जननायक चंद्रशेखर विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच मुलींची ज्या पद्धतीने वेगाने प्रगती करत आहेत, ते पाहून त्यांचा अभिमान वाटतो, असंही आनंदीबेन पटेल म्हणाल्या.

“आता जवळपास 80 टक्के पदकं मुली मिळवत आहेत, तर केवळ 20 टक्के पदकं मुलांच्या वाट्याला आली आहेत. अशीच स्थिती राहिल्यास पाच वर्षानंतर सर्व पदके मुली मिळवतील. येत्या काळात मुलांना पदकं मिळण्याची शक्यता नाही आणि मुलींचं उच्च शिक्षण पाहता त्यांना लग्नासाठी योग्य मुलं मिळणार नाहीत. त्यामुळे मुलं शिक्षणात मुलींच्या मागे का आहेत, यावर संशोधन करायला हवं," अशी मागणी आनंदीबेन पटेल यांनी विद्यापीठाला केली.

लखनौ येथील राजभवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यपाल पटेल यांनी दीक्षांत समारंभाला विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष कामगिरीचा दिवस म्हणून वर्णन केलं. "विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर आता त्यांचे सामाजिक जीवन सुरू होईल. या शिक्षणाचा त्यांना व्यावहारिक उपयोग करता येईल. चारित्र्यगुणांच्या सर्वोच्च विकासासाठी शिक्षण हा पाया आहे. घरात पालकांकडून मिळालेले प्राथमिक ज्ञान आणि संस्कार यातूनच हे शिक्षण मिळते," असंही त्या म्हणाल्या.

आनंदीबेन पटेल विद्यार्थ्यांना म्हणाल्या की, जग खूप वेगाने पुढे जात आहे, हे समजून घेत स्वत:ला सतत अपडेट करत रहा. विद्यापीठाने आपल्या कामांची गुणवत्ता आणि संशोधनाला चालना देण्यासाठी नवनवीन संशोधनांसह विस्तार केला पाहिजे. हवामान बदलाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून राज्यपालांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण आणि जलसंधारणाबाबतही चर्चा केली. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या काही नियतकालिके आणि शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे उद्घाटनही करण्यात आले.

First published:

Tags: Career, Career opportunities