मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आयटी इंडस्ट्रीत पटापट नोकरी बदलण्याची लाट! इंडस्ट्री याकडे कसं पाहते?

आयटी इंडस्ट्रीत पटापट नोकरी बदलण्याची लाट! इंडस्ट्री याकडे कसं पाहते?

 स्टार्टअपहून कमी पगार

स्टार्टअपहून कमी पगार

आयटी इंडस्ट्रीमध्ये सध्या नोकरी बदलाची लाट आली आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 सप्टेंबर: आयटी इंडस्ट्रीमध्ये (IT Industry) सध्या नोकरी बदलाची लाट आली आहे. अनेक कर्मचारी असलेली नोकरी सोडून झटपट दुसऱ्या कंपन्यांमध्ये (IT Giants Are Facing All Time High Attrition Rates) जॉइन होताहेत. या हाय अ‍ॅट्रिशन रेट्समुळे (Attrition Rate) टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या मोठ्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू केली आहे. चांगल्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी आकर्षक मोबदला देणं, तसंच विविध गोष्टींमध्ये कर्मचाऱ्यांचा समावेश करून घेणं अशा अनेक युक्त्या कंपन्या वापरत आहेत; मात्र मुळातच अ‍ॅट्रिशन रेट का वाढला व कंपन्या त्यावर कोणते उपाय करत आहेत, याबद्दल जाणून घेऊ या. याबाबतचं वृत्त 'कंटेंट डॉट टेकगिग' या वेबसाइटने दिलं आहे.

विप्रो, टीसीएस व इन्फोसिस या मोठ्या आयटी कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (First Qurter) 50 हजारांनी नोकरभरती वाढवली आहे. यावरून आयटी इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅट्रिशनविषयी कल्पना येईल. ज्या गतीनं कर्मचारी एक कंपनी सोडून दुसरीकडे रुजू होतात, त्याला अ‍ॅट्रिशन रेट (What Is Attrition Rate) म्हणतात. या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत इन्फोसिसचा अ‍ॅट्रिशन रेट सर्वांत जास्त म्हणजे 28.4 टक्के आहे. टेक महिंद्रा कंपनीचा हा रेट 22 टक्के, तर विप्रोचा 23.3 टक्के होता. कंपनीचा हाय टर्नओव्हर रेट अर्थात नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर वाढल्याविषयी बोलताना टेक महिंद्राचे सीईओ सी. पी. गुरनानी यांनी सांगितलं, की “यासाठी कंपनीच्या बिझनेसमध्ये पटापट झालेली वाढ (High Growth In Business) कारणीभूत असू शकेल. शॉक स्टेज आता आली आहे. जेव्हा एखादी कंपनी झटपट मोठी होते, तेव्हा अ‍ॅट्रिशन रेट 23-24 टक्के राहतो.”

गेल्या तिमाहीत टीसीएसनं आजवरच्या कोणत्याही तिमाहीतली सर्वोच्च नोकरभरती केली. टीसीएसनं एका तिमाहीत 35,209 कर्मचाऱ्यांची, तर एका वर्षात 1,03,546 कर्मचाऱ्यांची नोकरभरती केली. नव्या नोंदीनुसार, आता टीसीएसकडे 5,92,195 इतके कर्मचारी आहेत. इन्फोसिसनेही जवळपास तितक्याच कर्मचाऱ्यांची चौथ्या तिमाहीत भरती केली.

टीसीएसचा अ‍ॅट्रिशन रेट गेल्या तिमाहीतल्या 19.3 टक्क्यांपेक्षा वाढून आता 19.7 टक्के इतका झाला आहे. “सध्या कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट कमी झाला नसला, तरी भविष्यात होईल,” असं टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांचं म्हणणं आहे. अ‍ॅट्रिशन रेट सर्वसामान्य परिस्थितीत वाढतच होता, दुसऱ्या तिमाहीतही हीच परिस्थिती दिसेल; मात्र हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असं ते म्हणतात.

कर्मचारी नोकऱ्या का सोडताहेत?

सध्याच्या आकडेवारीवरून असं दिसतंय, की इतर क्षेत्रांमधल्या कंपन्यांपेक्षा भारतीय आयटी कंपन्यांमध्ये टर्नओव्हर रेट जास्त आहे. सध्याच्या नोकरीत कर्मचाऱ्यांना भविष्यात यशाच्या संधी आढळून येत नाहीत. तसंच स्पर्धा वाढल्यामुळे आयटी कंपन्यांचा वाढीचा (विकासाचा) दर पूर्वीइतका राहिला नाही. या दोन कारणांमुळे कर्मचाऱ्यांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याशिवाय त्याच क्षेत्रातल्या परदेशी कंपनीत जास्त पगाराची संधी उपलब्ध होत असेल, तरी कर्मचारी नोकरी बदलण्याचा विचार करतात.

कर्मचाऱ्यांच्या नोकरी बदलण्याच्या प्रक्रियेत कंपन्यांचं मोठं नुकसान होतं. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कंपनीचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होत असतात. अशा वेळी अनेक कर्मचारी नोकरी बदल करत असतील, तर कंपनीचं नुकसान होतं. एका कर्मचाऱ्यामागे 5 हजार डॉलरचा खर्च कंपनी करते. त्या कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यास कंपनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला घेऊन त्याला प्रशिक्षण देते. हा वेळ चार्जेबल समजला जात नाही. म्हणजेच कर्मचाऱ्यांकडून या काळात कामाची अपेक्षा नसते. उलट, त्यांना त्या काळासाठी आर्थिक मोबदला देण्याचं बंधन कंपन्यांवर असतं. कर्मचाऱ्याच्या नोकरी सोडण्यामुळे महसुलात झालेली घट, त्या नोकरीबदलात झालेलं आर्थिक नुकसान याचाही तोटा कंपनीला सहन करावा लागतो.

यावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देण्यासारखे काही उपाय कंपन्यांनी सुरु केले आहेत. विप्रोच्या एमडी आणि सीईओ Theirry Delaporte यांच्या म्हणण्यानुसार, “या तिमाहीच्या पदोन्नती आता झाल्या आहेत. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल.” आयटी कंपन्यांच्या नफ्यावर रिटेन्शन बोनस, अचानक केलेला पगारबदल व पगारवाढ यांचा परिणाम होतो.

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना इतर मार्गांनी भत्ते वगैरे देऊन नोकरी सोडण्यापासून परावृत्त करतात. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना हवं ते म्हणजे घरून काम करण्याची मुभाही देतात. टीसीएसनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑकेजनल ऑपरेशन्स झोन (OOZ) आणि हॉट डेस्क्स सुरू केले आहेत.

आयटी कंपन्यांमधली स्पर्धा वाढली आहे; मात्र त्या तुलनेत पगारात वाढ होत नाही. तसंच भविष्यात त्या कंपनीत विकास होण्याची कर्मचाऱ्यांना संधी दिसत नाही. यामुळे कर्मचारी कंपनीला रामराम करतात व झटपट नोकऱ्या बदलतात. कंपन्यांच्या मते ही लाट थोड्या दिवसांतच कमी होईल. तोवर कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी अनेक उपाय कंपन्यांना करावे लागत आहेत.

First published:

Tags: Career