मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Inspirational Story! नक्की का होतेय B.Tech पाणीपुरीवाली'ची चर्चा? बेरोजगारांसाठी प्रेरणादायी कहाणी

Inspirational Story! नक्की का होतेय B.Tech पाणीपुरीवाली'ची चर्चा? बेरोजगारांसाठी प्रेरणादायी कहाणी

बेरोजगारांसाठी प्रेरणादायी कहाणी

बेरोजगारांसाठी प्रेरणादायी कहाणी

'बी.टेक. पाणीपुरीवाली' नावानं असणाऱ्या या स्टॉलची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च:  इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. काहींना नोकरी लागते, व त्यांचा ती नोकरी टिकवण्यासाठी संघर्ष सुरू होतो; पण दिल्लीमध्ये एका तरुणीनं ‘बी.टेक.’ची पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या मागं न धावता पाणीपुरीचा स्टॉल टाकलाय. 'बी.टेक. पाणीपुरीवाली' नावानं असणाऱ्या या स्टॉलची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. ‘आज तक’ने या बाबत वृत्त दिलंय.

आजच्या काळात बेरोजगारीमुळे अनेक लोक हैराण झालेत, पण अशावेळी काही जण स्वतः रोजगाराच्या संधी निर्माण करतात. ‘एमबीए चहावाला’, ‘ग्रॅज्युएट चहावाली’ यांच्याबद्दल या पूर्वी तुम्ही ऐकलंही असेल. मात्र, आता आम्ही तुम्हाला ‘बी.टेक. पाणीपुरीवाली’बद्दल सांगणार आहोत.

ग्रॅज्युएशन होऊन बरीच वर्ष झाली पण Interview क्लिअर होत नाही? चिंता नको; अशी क्रॅक करा मुलाखत

दिल्लीतील टिळक नगरामध्ये तापसी उपाध्याय नावाची तरुणी 'बी. टेक. पाणीपुरीवाली' नावानं पाणीपुरीचा स्टॉल चालवते. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं व्हायरल होत असून, तिची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सध्या तापसी ‘बी.टेक. पाणीपुरीवाली’ नावानं प्रसिद्ध होत आहे. या मुलीनं दिल्लीतील टिळक नगर भागातील मार्केटमध्ये एक छोटासा स्टॉल सुरू केलाय. हा स्टॉल गाडीला जोडून दुसऱ्या ठिकाणीही नेता येतो. या स्टॉलवर ती तेल न लावता फ्राय केलेल्या पुरी वापरुन तयार केलेली पाणीपुरी विकते. पाणीपुरीचा हा अनोखा प्रकार लोकांना इतका आवडला आहे की, टिळक नगरमध्ये रस्त्यावर काउंटर लावणारी मुलगी खूपच प्रसिद्ध झाली आहे.

Career Tips: CBI मध्ये अधिकारी होण्यासाठी पात्रता असते तरी काय? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती

पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला कारण...

या स्टार्टअपची कल्पना काही संकटाच्या परिस्थितींना तोंड दिल्यानंतर सुचल्याचं तापसी सांगते. निराश होण्याऐवजी तिनं धैर्यानं संकटाला सामोरं जात पाणीपुरीचा स्टॉल सुरू केला आहे. तिला आता हा स्टॉल सुरू करून तीन महिने झालेत. ती सांगते, ‘मी पाणीपुरीसाठी वापरत असलेली पुरी तेलात तळून बनवत नाही. हे एक हेल्दी फूड आहे, ज्यामध्ये हातानं तयार केलेली प्रत्येक गोष्ट वापरली जाते. मला सुरुवातीपासूनच बाईक चालवायला आणि हेल्दी फूड खाण्याची आवड होती. त्यामुळेच मी हा नवा प्रयोग सुरू केलाय, जो लोकांच्या पसंतीस उतरलाय. मी दररोज चार ठिकाणी स्टॉल्स लावते. सध्या ही संख्या आणखी वाढवण्यासाठी तयारी करीत आहे.’

अशी सुचली कल्पना

इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना नवीन स्टार्टअपची कल्पना सुचल्याचं तापसीनं सांगितलं. त्यानंतर ‘बी.टेक. पाणीपुरीवाली’ या नावानं तिनं स्टॉल सुरू केला. लोकांना येथील पाणीपुरीची चव खूपच आवडली, तसंच पुरी बनवण्याची अनोखी पद्धतही खूप आवडली. त्यामुळे तापसी आज सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या स्टॉलवर येणारे अनेकजण तिच्यासोबत फोटो काढण्याचा, बोलण्याचा आणि तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

दरम्यान, नोकरी न मिळाल्यानं व्यवसायाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. तापसी उपाध्याय हे त्याचच उदाहरण आहे.

First published:
top videos