मराठी बातम्या /बातम्या /करिअर /पात्रता असूनही तुमच्यात कॉन्फिडन्सची कमी जाणवते का? मग हे Gaslighting तर नाही ना? असं ओळखा

पात्रता असूनही तुमच्यात कॉन्फिडन्सची कमी जाणवते का? मग हे Gaslighting तर नाही ना? असं ओळखा

गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते कसं ओळखायचं याची माहिती असणं आवश्यक आहे.

गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते कसं ओळखायचं याची माहिती असणं आवश्यक आहे.

गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते कसं ओळखायचं याची माहिती असणं आवश्यक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 डिसेंबर:  आपल्या शारीरिक आरोग्यसोबतच मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य म्हटलं की, बहुतेकांना फक्त तणाव म्हणजेच डिप्रेशनबद्दल माहिती असते. मात्र, डिप्रेशनव्यतिरिक्त अशा अनेक संकल्पना आहेत, ज्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. 'गॅसलायटिंग' ही अशीच एक संकल्पना आहे. गॅसलायटिंग म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची दिशाभूल करणं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याशी बोलत असताना, त्याच्या विवेकावर, निर्णयांवर आणि आठवणींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची क्रिया म्हणजे गॅसलायटिंग. अनेकदा आपल्या ओळखीचे लोक आपल्याला गॅसलायटिंगचा बळी बनवतात. गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते कसं ओळखायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जी व्यक्ती गॅसलायटिंगला बळी पडते अनेक वेळा तिला कल्पनाही नसते की आजूबाजूचे काही लोक आपली दिशाभूल करत आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. गॅसलायटिंगला बळी पडलेली कोणतीही व्यक्ती स्वतःच्या विचारांवर संशय घेऊ लागते. प्रत्येक गोष्टीसाठी ती स्वतःला दोष देऊ लागते. समोरची व्यक्ती तुम्हाला इतकी गोंधळात टाकते की तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते.

Maharashtra Police Bharti: नुसते हट्टे-कट्टे असून होत नाही गड्यांनो; बौद्धिक चाचणीही IMP; जाणून घ्या सिलॅबस

जी व्यक्ती तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर, तुम्हाला हरवल्यासारखं वाटू शकतं. तुमच्यामध्ये काहीतरी चूक आहे असं वाटू शकतं. ती व्यक्ती तुम्हाला दोषी किंवा संवेदनशील असल्याची जाणीव करून देते. हळूहळू या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही दिसू लागतो. तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता. तुमच्यात कोणतंही काम करण्याचं धाडस राहत नाही. तुम्ही जे काम कराल त्यात चूक होईल असं तुम्हाला वाटतं. या समस्येची वेळीच दखल घेतली नाहीतर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

तुम्ही गॅसलायटिंगचे बळी ठरत आहात, हे कसं शोधायचं?

आपण गॅसलायटिंगचा बळी ठरत आहोत किंवा आपल्याला बळी बनवणाऱ्या व्यक्तींना कसं ओळखायचं, हे जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती तुम्हाला गॅसलायटिंगचा बळी बनवतात, ती प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला जबाबदार धरते.

SBI PO 2022: बॅंकेत ऑफिसर म्हणून नोकरी हवीये ना? मग अशा पद्धतीनं करा SBI PO परीक्षेची तयारी

गॅसलायटिंगचे परिणाम

1) तुमच्या भावनांबद्दल प्रश्न पडतील: जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या सहवासात असाल जी दीर्घकाळापासून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ओव्हर-रिअॅक्ट करत आहात, असं तुम्हाला वाटेल.

2) तुमच्या निर्णयांवर तुम्हीच प्रश्न उपस्थित कराल: तुम्ही बोलताना पुन्हा-पुन्हा विचार कराल. तुम्ही जे विचार करत आहात तेदेखील चुकीचे आहेत, असं तुम्हाला वाटेल. तुमचे विचार इतरांशी शेअर करताना तुम्हाला बोलावसं वाटणार नाही. यामुळे, तुम्ही स्वतःसाठी कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. कारण, तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी योग्य नाही, अशी भावना तुमच्या मनात तयार होईल.

3) स्वतःबद्दल निराश व्हाल: तुम्हाला स्वतःबद्दल निराशा वाटेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. तुमच्याकडे काही चांगलं करण्याची क्षमता नाही, अशी भावना तुमच्या मनात घर करते.

गॅसलायटिंग टाळण्यासाठी 'या' व्यक्तींपासून लांब राहिलं पाहिजे

1) तुमच्याशी खोटं बोलणाऱ्या व्यक्ती: तुमची दिशाभूल करणारी व्यक्ती अनेकदा खोटे बोलते. अशा व्यक्तींना तुम्ही खोटं बोलताना पकडलं तरी त्या खरं बोलत नाहीत. काहीतरी कारणं सांगून त्या आपला मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शेवटी तुम्हालाच असं वाटतं की तुमचा मुद्दा चुकीचा आहे.

2) इतरांजवळ तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्ती: जी व्यक्ती तुम्हाला गॅसलाइट करते ती तुमच्या समोर तुम्हाला पाठिंबा देते. पण, तुमच्या पाठीमागे ती व्यक्ती तुमच्याबद्दल फार वाईट बोलते. अशी व्यक्ती तुम्हाला सांगते की, इतरांनादेखील तुमच्यामध्ये चुका दिसतात.

ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ ‘या' कोल्ड्रिंक कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; जगभरात खळबळ

3) तुमच्या भावनांबद्दल तुम्हाला वाईट वाटून घेण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्ती: जी व्यक्ती तुम्हाला गॅसलाइट करते ती तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल वाईट वाटून घेण्यास भाग पाडते. तुम्ही 'ओव्हर रिअॅक्ट' करत आहात, असं ही व्यक्ती तुम्हाला सांगते.

4) प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जबाबदार धरणाऱ्या व्यक्ती: प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाच जबाबदार धरणारी व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल तर तिच्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण, ती व्यक्ती तुम्हाला गॅसलाइट करत आहे. अशा व्यक्ती युक्तिवाद वापरून सर्व चुकीच्या गोष्टींचं खापर तुमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करतात.

5) तुमच्याशी फार गोड बोलणाऱ्या व्यक्ती: गॅसलाइट करणाऱ्या व्यक्ती तुमच्याशी बोलताना फार प्रेमळ असल्याचं भासवतात. त्या तुम्हाला अतिशय चांगला मित्र मानतात आणि त्या तुम्हाला कधीही दुःखी करू शकत नाहीत, असं सांगतात. पण, सतत तुम्हाला तुमच्या चुका सांगतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Jobs Exams