Railway Recruitment 2019: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी आहे नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक माहिती

तुम्ही सरकारी नोकरी शोधताय ? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेनं भरती सुरू केलीय. अनेक पदांवर या व्हेकन्सीज आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 10:11 PM IST

Railway Recruitment 2019: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी आहे नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई, 8 जुलै : तुम्ही सरकारी नोकरी शोधताय ? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेनं भरती सुरू केलीय. अनेक पदांवर या व्हेकन्सीज आहेत. स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कमर्शियल कम टिकट क्लर्क, ट्रेनों क्लर्क या पदांसाठी पश्चिम रेल्वेनं भरती सुरु केली आहे. 1 जुलैपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2019 ही आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी रेल्वेची आॅफिशियल वेबसाइट  www.rrc-wr.com वर अर्ज करावा.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

उमेदवारांची निवड लिखित टेस्टद्वारे आणि स्किल टेस्टमधील प्रदर्शन या आधांरावर केली जाईल. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा असेल. या पदांसाठी सामान्य उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 42 यामध्ये असावी. याशिवाय वयामध्ये असणारी इतर सूट यांविषयीची अधिक माहिती रेल्वेच्या आॅफिशियल वेबसाइट वर पाहू शकतात. जे उमेदवार कोणत्याही परिक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत ते या पदांसाठी अर्ज करु शकत नाहीत.

गो तस्करीचा संशय, पाहा काय केलं गो रक्षकांनी

रेल्वेने काढलेल्या व्हेकन्सीजच्या पदांची माहिती –

Loading...

स्टेशन मास्टर - 135 पद

गुड्स गार्ड - 100 पद

सीनियर कमर्शियल कम टिकट क्लर्क - 129 पोस्ट

वाणिज्यिक सह टिकट क्लर्क - 238 पोस्ट

जूनियर क्लर्क सह टाइपिस्ट - 105 पद

ट्रेन क्लर्क - 18 पद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...