मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सरकारी नोकरी: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी होणार भरती; आजच 'या' वेबसाईटवर करा अप्लाय

सरकारी नोकरी: रेल्वेत स्टेशन मास्टर पदासाठी होणार भरती; आजच 'या' वेबसाईटवर करा अप्लाय

Railway

Railway

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 असणार आहे.

नवी दिल्ली, 04 जुलै: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (Western-Central railways) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. स्टेशन मास्टर (Station Master Recruitment) पदासाठी ही भरती होणार असून त्यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार स्टेशन मास्टरच्या एकूण 38 जागा रिक्त आहेत. यात 18 जागा या अनारक्षित प्रवर्गासाठी (Open Category) आहेत तर इतर 20 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी पदभरती

स्टेशन मास्टर (Station Master) - एकूण जागा 38

कोणासाठी किती जागा

अनारक्षित वर्ग (Open)- 18

SC  - 5

ST  - 3

OBC  -12

हे वाचा - रक्षा मंत्रालयात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अनारक्षित श्रेणी - 18 ते 40 वर्षे

OBC  - 18 ते 43 वर्षे

SC/ST - 18 ते 45 वर्षे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Railway jobs