मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Study Abroad: परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे? केंद्र सरकारच्या 'या' शिष्यवृत्तींची होईल मदत

Study Abroad: परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे? केंद्र सरकारच्या 'या' शिष्यवृत्तींची होईल मदत

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमुळे (स्कॉलरशीप) मोठी मदत होते. या शिष्यवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळतेच शिवाय तिथे होणारा त्यांचा खर्चही भागतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 09 जानेवारी:   व्यक्तीच्या जीवनामध्ये उच्च शिक्षणाला फार महत्त्व आहे. उच्च शिक्षणामुळे आपल्याला चांगली नोकरी मिळून आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. शिवाय समाजामध्ये आदराची वागणूकही मिळते. परिणामी, उच्च शिक्षण घेण्यासाठी आजकाल सर्वात प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश कसा मिळेल? यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात. काही विद्यार्थ्यांचं तर शिक्षणासाठी परदेशात जाण्याचंही स्वप्न असतं. शिक्षणाचा खर्च हा घटक परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आपल्या देशात असे अनेक विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत. पण, परदेशात जाण्याच्या खर्च पेलवत नसल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी बाहेर जाता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमुळे (स्कॉलरशीप) मोठी मदत होते. या शिष्यवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळतेच शिवाय तिथे होणारा त्यांचा खर्चही भागतो. परदेशात शिकण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीनं विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा

  पीएचडी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

  केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप प्रोग्राम चालवला जातो. परदेशी संस्थांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणं हा या फेलोशिपचा उद्देश आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. फेलोशिप मिळवण्यास इच्छुक असलेला विद्यार्थी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथेमॅटिक्स (स्टेम) विषयातील पूर्ण-वेळ पीएचडीशी संबंधित असणं आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी serbonline.in या वेबसाईटला भेट द्या.

  NOKIA कंपनी मुबंईत करणार या पदांसाठी भरती; ऑनलाईन पद्धतीनं लगेच करा अप्लाय

  गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून अनेक शिष्यवृत्ती दिल्या जातात. यामध्ये नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेचाही समावेश आहे. ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, लुप्त होत असलेल्या भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील विद्यार्थ्यांना दिली जाते. परदेशात जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, nosmsje.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये, तुम्हाला वैयक्तिक तपशील, अभ्यासक्रमाचं नाव आणि परदेशी विद्यापीठाचे नाव नमूद करावं लागेल. याशिवाय पुराव्यासाठी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. इच्छुक विद्यार्थ्याला किमान 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असले पाहिजेत.

  एसटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

  एखाद्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर त्याला देखील सरकारच्यावतीनं आर्थिक मदत केली जात आहे. आदिवासी विकास मंत्रालयामार्फत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना चालवली जाते. यासाठी overseas.tribal.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण, पीएचडी आणि पोस्ट-डॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

  अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी 'पढो परदेश' ही योजना चालवली जाते. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी minorityaffairs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या योजने अंतर्गत परदेशातील शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज माफ केलं जातं. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा बँक तपशील द्यावा लागतो.

  परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि इतर काही मंत्रालये आर्थिक मदत देतात. त्यासाठी वरील प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. शिक्षण मंत्रालयाच्या education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देखील या शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळेल.

  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job