मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचय? जाणून घ्या शिक्षण, नोकरीच्या संधी अन् पगार एका क्लिकवर

आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचय? जाणून घ्या शिक्षण, नोकरीच्या संधी अन् पगार एका क्लिकवर

आर्किटेक्चरमधील संधी

आर्किटेक्चरमधील संधी

निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींचं बांधकाम हे रिअल इस्टेट उद्योगाचे प्रमुख घटक आहेत. या प्रकल्पांची रचना आणि नियोजन करण्यात आर्किटेक्ट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 11 मार्च :  बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होताच विद्यार्थी शाळांमधून महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी सज्ज होतात. या संक्रमणाची पहिली पायरी म्हणजे करिअरसाठी योग्य शाखेची निवड करणं. प्रत्येकानं असं करिअर निवडलं पाहिजे की, जे नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सक्षम ठरू शकेल. आर्किटेक्चर हे गतिमान आणि सतत विकसित होत असलेलं क्षेत्र आहे. ते सर्जनशील आणि नावीन्याची आवड असलेल्या व्यक्तींसाठी करिअरच्या असंख्य संधी देते.

  भारतात वाढत्या बांधकाम उद्योगामुळे आणि देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या सरकारी उपक्रमांमुळे अलीकडच्या काही वर्षांत आर्किटेक्ट्सची मागणी झपाट्यानं वाढत आहे. शहरीकरण, शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम इमारतींवर वाढता फोकस हे घटक लक्षात घेऊन विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि डिझाइनमध्ये आपलं कौशल्य दाखवू शकतील अशा कुशल आर्किटेक्ट्ससाठी असंख्य संधी उपलब्ध होत आहेत.

  निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींचं बांधकाम हे रिअल इस्टेट उद्योगाचे प्रमुख घटक आहेत. या प्रकल्पांची रचना आणि नियोजन करण्यात आर्किटेक्ट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

  आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे तपशील

  1) अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम : भारतात आर्किटेक्चरमधल्या करिअरसाठी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) ही पदवी घेण्याची आवश्यकता असते. B.Arch हा अभ्यासक्रम साधारणपणे पाच वर्षांचा असतो आणि त्यात डिझाइन, आर्किटेक्चरचा इतिहास, इमारत बांधकाम आणि कॉम्प्युटर-एडेड डिझाइन (सीएडी) या विषयांचा समावेश होतो.

  2) पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राम : B.Arch पदवी पूर्ण केल्यानंतर, आर्किटेक्ट्स मास्टर ऑफ आर्किटेक्चर (M.Arch) प्रोग्राम निवडू शकतात. M.Arch हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तो टिकाऊ डिझाइन किंवा शहररचना यासारख्या वास्तुकलांच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्रगत शिक्षण देऊ करतो.

  ३) सर्टिफिकेशन कोर्सेस : B.Arch किंवा M.Arch पदवी व्यतिरिक्त, ग्रीन बिल्डिंग डिझाइन किंवा बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगमध्ये (बीआयएम) सर्टिफिकेशन कोर्सेस उपलब्ध आहेत.

  नोकरीच्या संधी

  आर्किटेक्चर क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थी आर्किटेक्ट, आर्किटेक्चर इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्ट, शहर नियोजक, ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट, प्रकल्प व्यवस्थापक आणि नोकरीचे इतर अनेक पर्याय निवडू शकतात.

  करिअरमध्ये लवचिकता

  लवचिकता हा या क्षेत्रात करिअर करण्याचा एक मोठा फायदा आहे. आर्क्टिटेक्टकडे आर्किटेक्चर फर्म, सरकारी एजन्सी, ना-नफा संस्था किंवा सेल्फ-एम्प्लॉइड कन्सल्टंट म्हणून काम करण्यासारखे विविध प्रकारचे पर्याय आहेत. यामुळे आर्क्टिटेक्ट्सना आपली आवड, कौशल्यं आणि इतर उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्याची संधी मिळते.

  सर्जनशीलता आणि समस्या सोडवणं

  आर्किटेक्चर हे एक अत्यंत सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण क्षेत्र आहे. त्यासाठी क्रिटिकल थिंकिंग आणि समस्या सोडवण्याची कौशल्यं आवश्यक असतात. या क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचा वापर नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी रचना आणि बांधकाम करण्यासाठी केला पाहिजे. आर्किटेक्ट्सनी इमारतीची रचना करताना कार्यक्षमता, सुरक्षितता, टिकाऊपणा आणि सौंदर्यासह अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. ते जटील समस्या सोडविण्यास सक्षम असले पाहिजेत. उदाहरणार्थ, झोनिंग आवश्यकता पूर्ण करणार्‍या इमारतीची रचना करणं, कमी बजेटमध्ये बसणारी आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास सक्षम असलेली इमारत तयार करणं.

  आता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाची डिग्री पुण्यात घ्या! ड्युअल डिग्री कोर्स भारतात लाँच

  चांगल्या कमाईची शक्यता

  आर्किटेक्चरमधल्या करिअरमध्ये मोठ्या कमाईची क्षमता आहे. विशेषत: ज्यांच्याकडे यशस्वी प्रकल्पांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे, उच्च-गुणवत्तेचं काम वितरीत केल्याची ओळख आहे आणि व्यवसाय वाढवण्याची क्षमता आहे, ते या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. आर्किटेक्ट्सना चांगला पगार मिळतो. भारतातल्या आर्किटेक्ट्सवा सरासरी 9 लाख 50 हजार रुपये वार्षिक पगार मिळत आहे. हे आकडे अनुभव, ठिकाण आणि नियोक्त्याच्या प्रकारानुसार बदलूदेखील शकतात.

  लेखिका - रेखा केजरीवाल, शैक्षणिक संचालक, फॅशन अँड आर्ट अ‍ॅकॅडमी (एएफए)

  First published:
  top videos

   Tags: Career