Home /News /career /

वसई विरार महानगरपालिकेत कायदे तज्ज्ञांची पदभरती; 15 जुलैच्या आधी पाठवा अर्ज

वसई विरार महानगरपालिकेत कायदे तज्ज्ञांची पदभरती; 15 जुलैच्या आधी पाठवा अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2021 आहे.

    वसई, 03 जुलै: वसई विरार शहर महानगरपालिकामार्फत (Vasai Virar MNC Recruitment 2021) लवकरच कायद्याचा (Law) अभ्यास पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपल्बध होणार आहे.  या भरतीची अधिसूचना करण्यात जारी करण्यात आली आहे. वकिल (Lawyer) आणि ज्येष्ठ सल्लागार (senior consultant) या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2021 आहे. या पदांसाठी भरती वकील (Lawyer) जेष्ठ सल्लागार (senior consultant) एकूण जागा - 12 हे वाचा - नाशिकच्या रेडिओ स्टेशननं उंचावली महाराष्ट्राची मान! वाचून वाटेल अभिमान शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचा अभ्यास केला असणं आवश्यक आहे. तसंच कायदयाच्या अभ्यासात पदवी असणंही आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Vasai virar

    पुढील बातम्या