मुंबई, 28 मे: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जून अखेरीस 10 वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसंच कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठं संकट आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी दहावी मूल्यमापन प्रक्रिया आणि अकरावी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होईल. राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.
बारावी परिक्षेबाबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेणार आहोत. सीबीएसई सोबत आमचं बोलणं सुरू असून विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्यात.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हेही वाचा- एकच नंबर! देवेंद्र फडणवींसाचा 'हा' निर्णय ऐकून तुम्हालाही होईल आनंद
नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना सरकार निर्णयानुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांना तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसल्यास त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
दरम्यान शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिक्षणमंत्र्यांच्या पत्रकार परिषदतले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ssc board, Varsha gaikwad