Home /News /career /

मोठ्या पगाराची नोकरी सोडून UPSCची तयारी, जाणून घ्या वर्णित नेगींची Success Story

मोठ्या पगाराची नोकरी सोडून UPSCची तयारी, जाणून घ्या वर्णित नेगींची Success Story

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी उमेदवारांनी स्वत: वर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे.

    नवी दिल्ली, 6 जून: आपण अनेक आयएएस (IAS) आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा वाचल्या असतील. असं म्हणतात की, एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एखादं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. याचं एक उत्तम उदाहरण आहेत वर्णित नेगी (Varnit Negi). बऱ्याच विद्यार्थ्यांनी यूपीएससीची (UPSC exams) तयारी सोडून दुसरे काम करण्यास सुरुवात केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र, वर्णित नेगी यांची कहाणी याच्या पूर्णपणे उलट आहे. वर्णित यांनी यूपीएससीची तयारी करण्यासाठी आपली लाख रुपये पगाराची नोकरी सोडली (left big salary job). पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. मात्र, त्यांनी जिद्द आणि अभ्यास सोडला नाही. वर्णित यांचा आयएएस होण्याचा प्रवास सोपा नव्हता. 2018 मधील 13 व्या क्रमांकावर आलेल्या वर्णित यांचा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलं आहे. वर्णित नेगी (Varnit Negi) यांनी इंजीनियरिंग केलं आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. जवळपास 2 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करायचं ठरवलं आणि त्यासाठी दिल्ली गाठली. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली. त्या परीक्षेत ते मेन्स क्लिअर करू शकले नाहीत. मात्र, त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. NBE Recruitment 2021: राष्ट्रीय परीक्षा बोर्डात भरती; 12वी पास तरुणांना नोकरीची संधी पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर वर्णित यांनी आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. पुन्हा जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससीची परीक्षा पास केली मात्र, रँक चांगली नव्हती. वर्णित यांची रँक 504 होती. त्यामुळे त्यांना आयएएस सेवा मिळाली नाही. त्यांची इच्छा पुन्हा एकदा अपुरी राहिली. दोनदा अपयश आल्यानंतर ‘मी हिम्मत न हारता पुन्हा तयारी केली’ असं वर्णित सांगतात. दोन वेळा अपयश आल्यानंतर वर्णित यांनी 2018मध्ये तिसऱ्यांदा परीक्षा दिली. यासाठी त्यांनी अभ्यासाचं नीट प्लॅनिंग केलं आणि त्यांना 13वी रँक मिळाली. ‘माझा निर्धार पक्का असल्यानं मी पास होऊ शकलो,’ असं वर्णित म्हणाले. वर्णितचा विद्यार्थ्यांना सल्ला वर्णित नेगी म्हणतात की, यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी उमेदवारांनी स्वत: वर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. तसेच अभ्यासासाठी मेहनत करा मात्र थोडा स्मार्ट स्टडी करा. ते म्हणाले की ‘या प्रवासात कुटुंबीय आणि मित्रांचा सपोर्ट असणं आवश्यक आहे. ते हिम्मत देतात आणि आपण आणखी जोमाने तयारी करू शकतो. आपल्या अपयशामुळे खचून न जाता चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करून आपलं ध्येय गाठण्याचा विचार केला पाहिजे’ असं वर्णित सांगतात.
    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या