मुंबई, 05 जून: या जगात असं कोणीही नाही ज्यांना आयुष्यभर सुख मिळतं तर असंही कोणी नाही ज्यांना आयुष्यभर दुःखं मिळतं. सुख दुःखाचा हा खेळ चालूच असतो. मात्र काही जण असेही असतात ज्यांना अगदी लहान वयापासूनच दुःखांच्या या खेळात सहभागी व्हावं लागतं. एका मागोमाग एक संकटांचा फेरा त्यांच्यामागे लागलाच असतो. अशीच काही कहाणी आहे अशा भावंडांची ज्यांना कोरोनानं अनाथ केलं आणि त्यात त्यांच्यामागे ससेमिरा लागला तो LIC चा.
असंच दुर्दैव भोपाळच्या वनिषा पाठकच्या
(Vanisha Pathak) नशिबी आलं. मागील वर्षी दहावीचा निकाल लागला आणि दहावीच्या परीक्षेत तिनं इंग्लिश, संस्कृत, समाजशास्त्र या विषयांमध्ये 100 पैकी 100 तर गणितात 100 पैकी 97 गुण मिळवले. मात्र तिचे हे यश बघायला तिचे आई-वडील तिच्याबरोबर नव्हते. त्यात वडिलांनी LIC मधून होमलोन घेतलं असल्यामुळे वनिषा आणि तिच्या भावंडांच्या मागे LIC नं नोटिसांचा ससेमिरा लावला.
MH BOARD 10TH AND 12TH RESULT: आला..आला बोर्डाच्या निकालाचा आठवडा; प्रवेशासाठी लगेच 'ही' IMP कागदपत्रं जोडा; लिस्ट बघा
ज्यावेळी वडलीअण्णा हे लोन घेतलं त्यावेळी वनिषा ही अल्पवयीन होती त्यामुळे तिचं त्याकडे फारसं लक्ष नव्हतं. मात्र वडिलांचं छत्र हरपल्यानंतर अचानक नोटीस सुरु झाल्यामुळे वनिषा गोंधळून गेली. यांनतर तीन बरेचदा संबंधित लोन फेडण्यासाठी वेळ देण्यात यावा म्हणून LIC कडे मागणी केली मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही.
अडचणींचा डोंगर
वनिषाचे आई-वडील कोरोनानं हिरावून घेतल्यानंतर तिला आणि तिच्या भावासमोर अडचणींचा डोंगर उभा झाला होता. त्यात आई-वडिलांच्या काही दिवसातच दहावीचा निकाल लागला, यात वनिषा टॉपर होती. पण या सगळ्याचा कौतुक सोहळा करण्यासाठी तिचे आई वडील नव्हते. त्यात LIC कडून सतत पैशाची मागणी करण्यात येत होती.
कायदेशीर कारवाईचा इशारा
जर होमलोनचे सर्व पैसे परत दिले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही LIC च्या नोटिशीमधीं वनिषाला देण्यात आला होता. वेळोवेळो यांसंबंधीचे परे वनिषाकडून पाठवण्यात आल्यानंतरही तिच्या पात्रांची दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.
वाह रे पठ्ठ्या! IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यानं जिंकली जागतिक कोडिंग स्पर्धा
LIC कडून दखल नाही
"वनिषाचे वडील जितेंद्र गे LIC एजंट होते. तसंच ते मोठे LIC डिलरही होते. त्यांची आणि त्यांच्या मुलांच्या पात्रांची दखल LIC तर्फे घेण्यात यायला हवी होती" असं वनिषाच्या मामांनी म्हंटलं आहे. मात्र अशा काही विद्यार्थ्यांसाठी आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आणि कर्ज घेतलेल्या लोकांसाठी काहीच तरतूद नाही का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. वनिषासारख्या अनेक अनाथ विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.