मंदीत संधी! पोस्टामध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती! कसा करायचा अर्ज?

मंदीत संधी! पोस्टामध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती! कसा करायचा अर्ज?

कोरोना (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात ज्यांनी रोजगार गमवले आहेत त्यांच्यासाठी भारतीय डाक (Indian post) विभागाने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर: लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेलेल्या लोकांसाठी आता रोजगाराची वेगवेगळी द्वारं उघडत आहेत. सराकारी तसंच खासगी कंपन्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. कोरोना (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात ज्यांनी रोजगार गमवले आहेत त्यांच्यासाठी भारतीय डाक विभागाने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय डाक (Indian post) विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन (Postman) आणि मल्टिटास्किंगच्या 1371 जागांवर भरती करण्यात येणार आहे.

कसा करायचा अर्ज?

पोस्टाच्या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जासाठी 100 रुपये आणि परीक्षा शुल्क 400 रुपये असे एकूण 500 रुपये उमेदवारांना भरायला लागतील.

आरक्षित प्रवर्ग आणि महिलासांठी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज - https://www.maharashtrapost.gov.in/ किंवा https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/1582_30_2020.pdf  या लिंक तपासून अधिक माहिती पहावी.

किती असेल पगार?

पोस्टमन - मेल गार्ड या पदांसाठी 21,700 ते 69100 रुपये पगार

मल्टि टास्किंग स्टाफ - या पदांसाठी 18,000 ते 56,900 रुपये पगार देण्यात येईल

शैक्षणिक अटी कोणत्या?

मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण

मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक, दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात होणं आवश्यक

संगणक वापरता येणं आवश्यक

पोस्टमन पदांसाठी टूव्हिलरचं लायसन्स गरजेचं

लायसन्स नसल्यास 2 वर्षाच्या आत लायसन्स काढणं आवश्यक

राज्यभरातून पोस्ट खात्यात पोस्टमनपदासाठी 1029 पदं उपलब्ध आहेत तर मेल गार्ड पदासाठी 15 पदांची भरती आहे. अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर या पदासाठी 32 पदं उपलब्ध आहेत. तसंच सबऑर्डिनेट ऑफिसर या पदासाठी 295 पदं उपलब्ध आहेत. पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी 18 ते 27 वयोमर्यादा आहे. मल्टिटास्किंग स्टाफच्या पदांसाठी 18 ते 25 वर्षाची मर्यादा आहे. SC, ST, PWD प्रवर्गांसाठी वयाच्या मर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची मुदत सुरू झाली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 9, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या