मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'बीएमसी'च्या शाळांमध्ये शिक्षकांची 810 पदं रिक्त; मराठी शाळांना हवेत 259 शिक्षक

'बीएमसी'च्या शाळांमध्ये शिक्षकांची 810 पदं रिक्त; मराठी शाळांना हवेत 259 शिक्षक

बीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त

बीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त

कोरोना काळात एकूणच शिक्षणावर परिणाम झालेला असताना आता शिक्षकांच्या कमतरतेमुळे एक नवी समस्या बीएमसी शाळांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये (Schools) पुरेसे शिक्षक (Teachers) उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. कोरोना काळात एकूणच शिक्षणावर परिणाम झालेला असताना आता शिक्षकांच्या कमतरतेमुळे एक नवी समस्या बीएमसी शाळांमध्ये (BMC Schools) निर्माण झाल्याचं चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची 810 पदं रिक्त आहेत, असं `मिड-डे`च्या वृत्तात म्हटलं आहे. 810 ही संख्या एकूण रिक्त पदांच्या केवळ 11 टक्के एवढी आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तब्बल 259 जागा रिक्त आहेत. तसंच मुंबई पब्लिक स्कूलमध्ये (एमपीएस) 222 जागा रिक्त आहेत. `बीएमसी`ने तीन वर्षांपूर्वी शिक्षक भरतीतील चांगल्या उमेदवारांनी मूळ शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं होतं या कारणामुळे नोकरी नाकारली होती त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. या पूर्वी जुलै महिन्यात बीएमसीने कंत्राटी पद्धतीनं (Contract Basis) शिक्षकांची भरती केली होती. शिक्षकांच्या कमतरतेची झळ विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून हा तात्पुरता उपाय करण्यात आला होता.  कायमस्वरुपी नियुक्त्यांना वेळ लागू शकतो हे लक्षात घेऊन, आम्ही जुलैमध्ये एक परिपत्रक जारी करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचे आदेश दिले होते. या परिपत्रकात मुख्याध्यापकांना तासिका-वेतन आधारावर कंत्राटी पद्धतीनं शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली होती, अशी माहिती `बीएमसी`चे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. कंकाळ म्हणाले,``शिक्षकांना जाणं सोयीचं असलेल्या म्हणजे घराजवळच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेशी आहे असं लक्षात आल्यानंतर प्रत्येक शाळेला चांगले शिक्षक उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व शाळांतील 20 टक्के पदं रिक्त ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. गुजराथी आणि तमिळ माध्यमांच्या पालिका शाळांमध्ये (Civic Schools) पुरेसे शिक्षक कर्मचारी आहेत. ते पुढे म्हणाले, आम्हाला नुकतीच मुंबई येथील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून माध्यमिक शाळांमधून 550 अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीची परवानगी मिळाली आहे. जर त्यांनी पालिका शाळांमधली रिक्त पदं भरली तर आम्हाला कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि समस्या सुटेल. आम्ही शिक्षकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून (NGO) शिक्षकांची भरती करणार आहोत, असं त्यांनी सांगितले. हेही वाचा - UPSC Tips: परीक्षेसाठी कोणत्या कॅटेगिरीला किती असतात Attempt? किती असतो पगार? इथे मिळेल माहिती दरम्यान, मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतल्याचं कारण देत बीएमसीने तीन वर्षांपूर्वी 250 चांगल्या उमेदवारांना नोकरी दिली नव्हती. त्यांना कामावर घेतलं असतं, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती,`` असं महापालिका शाळेच्या एका मुख्याध्यापकाने सांगितले. चांगल्या शिक्षकांना कामावर न घेता पालिका शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या कसल्या गप्पा मारत आहे?, असा सवालदेखील मुख्याध्यापकाने केला आहे.
First published:

Tags: Career, Education

पुढील बातम्या