मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! शाळेतील परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा; ही ट्रिक वापरुन काही क्षणांमध्येच सोडवा अवघड गणितं

क्या बात है! शाळेतील परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा; ही ट्रिक वापरुन काही क्षणांमध्येच सोडवा अवघड गणितं

आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक (Maths trick) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार (Multiplication trick) चुटकीसरशी सोडवू शकाल.

आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक (Maths trick) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार (Multiplication trick) चुटकीसरशी सोडवू शकाल.

आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक (Maths trick) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार (Multiplication trick) चुटकीसरशी सोडवू शकाल.

गणित म्हटलं की आजही कित्येकांना घाम फुटतो. काही दिवसांपूर्वी कित्येक कोटींपर्यंतचे पाढे पाठ असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पाढे पाठ असतील, तर आपल्याला गुणाकार प्रक्रिया (Multiplication without help of tables) अगदीच सोपी वाटते. पण, सगळ्यांना तर एवढे पाढे पाठ नसतात. 10, 12 किंवा फारफार तर 15 पर्यंतचे पाढे आपल्याला लक्षात असतात. त्यापेक्षा मोठ्या संख्यांचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरचीच (Multiplication without help of calculator) मदत घ्यावी लागते. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक (Maths trick) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार (Multiplication trick) चुटकीसरशी सोडवू शकाल. कित्येक स्पर्धा परीक्षांमध्ये (Multiplication trick for exam) गणिताचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. त्यातच कॅल्क्युलेटर बाळगण्यास परवानगी नसते, आणि वेळही अगदीच कमी असतो. अशा वेळी एक सोपी ट्रिक वापरुन तुम्ही काही क्षणांमध्येच कितीही अवघड गुणाकार करू शकाल. ही ट्रिक खरं तर वैदिक गणितामधून (Vedic maths multiplication trick) घेण्यात आली आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये कोणत्याही संख्येला 11 ला गुणायचं असेल, तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकाल. कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने गुणायचे असल्यास, सर्वांत आधी त्या संख्येतील दोन्ही अंकांच्या मध्ये एक कंस ठेवायचा आहे. यानंतर त्या संख्येतील दोन्ही अंकांची या कंसात बेरीज करायची आहे. यानंतर त्या संख्येतील पहिला अंक, कंसातील एक अंक आणि मूळ संख्येतील तिसरा अंक हे तिन्ही मिळून एक तीन अंकी संख्या तयार होईल, जे तुमचं उत्तर असेल. उदाहरण म्हणून आपण 35x11 या प्रश्नाचं उत्तर शोधूया. वर सांगितलेली ट्रिक वापरताना आपल्याला 35च्या मध्ये कंस ठेऊन त्यात 3 आणि 5 ची बेरीज करायची आहे. म्हणजेच, 3(3+5)5 = 3(8)5. म्हणजेच 35x11 चे उत्तर 385 आहे. हे वाचा - Study Tips: भरपूर अभ्यास करूनही काहीच लक्षात राहत नाही? वाचा 'या' सोप्या टिप्स आता कंसातील संख्येची बेरीज केल्यानंतर येणारी संख्या दोन अंकी असेल, तर काय करायचं? हेदेखील आपण एका उदाहरणातून पाहू. जर आपण 69 या संख्येला 11 ने गुणणार आहे, तर कंसातील संख्यांची बेरीज करेपर्यंत सर्व स्टेप वरीलप्रमाणेच करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला 6(6+9)9= 6(15)9 अशी संख्या मिळेल. मात्र, आता त्याला जसंच्या तसं लिहून चालणार नाही. कंसातील संख्या दोन अंकी असेल, तर त्यातील पहिला अंक बाहेर काढून, कंसाच्या पूर्वी असणाऱ्या अंकासोबत त्याची बेरीज करायची आहे. म्हणजेच, 6(15)9 = 6+1(5)9 असं इक्वेशन आपल्याला मिळेल. यानंतर ही बेरीज सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. 6+1(5)9 = 7(5)9. म्हणजेच, 69x11 या प्रश्नाचं उत्तर 759 असं आहे. अशा प्रकारे तुम्ही काही क्षणांमध्येच कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने गुणू शकता. या ट्रिकचा वापर करून आलेले उत्तर हे अगदी अचूक असणार आहे. परीक्षेत चार ते पाच टप्प्यांमध्ये गणित सोडवण्यापेक्षा या मार्गाने गणित सोडवाल, तर नक्कीच तुमचा मोलाचा वेळ वाचणार आहे.
First published:

पुढील बातम्या