• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • UPSSSC PET Result: उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग परीक्षेचा निकाल घोषित; असा बघा तुमचा निकाल

UPSSSC PET Result: उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग परीक्षेचा निकाल घोषित; असा बघा तुमचा निकाल

परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचं स्कोअर कार्ड दिलेल्या लिंकवर उमेदवारांना बघता येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: बहुप्रतीक्षित उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग परीक्षेचा निकाल (UPSSSC PET Result:2021) अक्लहेर जाहीर करण्यात आला आहे. प्राथमिक पात्रता परीक्षा 2021 (PET Resiult 2021) म्हणजेच UP PET 2021 (UPSSSC PET Result) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. upsssc.gov.in या ऑफिशिअल वेबसाईटवर (how to check UPSSSC PET Result) हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचं स्कोअर कार्ड दिलेल्या लिंकवर उमेदवारांना बघता येणार आहे. UPSSSC नं ही PET 2021 ही परीक्षा 24 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केली होती. अनेक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यानुसार आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात अधिकारी बानू इच्छिणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. NEET Result: NEET निकालाबाबत मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं केला रद्द UPSAC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांनी जारी केलेले PET 2021 डिजिटल प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असणार आहे. तसंच हा कालावधी निकाल घोषित होण्याच्या तारखेपासून म्हणजेच आज, 28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल. यूपी पीईटी स्कोअरच्या आधारे, आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या गट सी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना थेट मुख्य परीक्षा किंवा कौशल्य चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे. अशा पद्धतीनं चेक करा निकाल सुरुवातीला upsssc.gov.in या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या. यानंतर होमपेजवर दिलेल्या नोटीस सेक्शनमध्ये UPSSSC PET 2021 या लिंकवर क्लिक करा. यानंतर नवीन पानावर तुमचं तपशील (नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर इ.) भरून सबमिट करा यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहता येईल. याची प्रिंट आऊट घेतल्यानंतर,उमेदवारांनी भविष्यातील गरजांसाठी सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून ठेवावी.
  Published by:Atharva Mahankal
  First published: