मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Tips: तुम्हालाही IAS व्हायचंय? मग 'हे' महत्त्वाचे गुण तुमच्यामध्ये आहेत ना? एकदा लगेच करा चेक

UPSC Tips: तुम्हालाही IAS व्हायचंय? मग 'हे' महत्त्वाचे गुण तुमच्यामध्ये आहेत ना? एकदा लगेच करा चेक

UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

UPSC परीक्षेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत ज्या तुम्हाला असतील तर तुम्ही एक IAS होण्यायोग्य आहात की नाही हे ओळखू शकता

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 एप्रिल: आपल्यापैकी IAS ऑफिसर (How to become IAS Officer) होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. यासाठी अनेकजण मोठ्या जिद्दीनं आणि मेहनतीने अभ्यासही करत असतात. UPSC क्रॅकही (How to crack UPSC in single attempt) करतात. मात्र असे विद्यार्थी काही वेळा IAS च्या मुलाखती (how to crack IAS Interview) दरम्यान अपयशी होतात. याचं प्रमुख कारण म्हणजे असे विद्यार्थी देशात चाललेल्या प्रश्नांची उत्तरं योग्य रितीनं देऊ शकत नाहीत. म्हणूनच मुलाखतकारांचा असा समज होतो की अशा उमेदवारांमध्ये IAS होण्याची पात्रता (Eligibility for IAS Officer) आणि गुण नाही. तुमच्यात एका IAS ऑफिसरचे गुण (Skills of an Ideal IAS officer) आहेत की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता नको. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत ज्या तुम्हाला असतील तर तुम्ही एक IAS होण्यायोग्य आहात की नाही हे ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

प्रामाणिकता महत्त्वाची

या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक असणं आवश्यक आहे. या परीक्षेची तयारी करणं सोपी नाही. मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर वेळापत्रक बनवा आणि त्याचे प्रामाणिकपणे पालन करा. म्हणूनच जर तुमच्यात प्रामाणिकता हा गुण असेल तर तुम्ही IAS होण्यासाठी परफेक्ट उमेदवार आहात.

फ्रेशर्स उमेदवारांनो, कामाचा अनुभव नसेल तरी तुमच्याकडे 'हे' स्किल्स असणं आवश्यक

प्रॉब्लेम सॉल्व्हिंग

जर तुम्हाला समाजात किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक दुःखी दिसत आतील किंवा त्यान्ना काही समस्या आहे असं दिसत असेल आणि तुम्ही त्यांना मदत करत आहात तर हा गुण तुमच्यासाठी फायद्याचा आहे. तुमच्यातील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता तुम्हाला IAS ऑफिसर बनवू शकते.

कॉमन सेन्स

कॉमनसेन्स असणं ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. मात्र ही सर्वांमध्ये असेलच असं नाही. जर तुमच्यामध्येही कॉमनसेन्स म्हणजे कुठे, कधी आणि काय बोलावं-वागावं याची समज असेल तर तुम्ही एक परफेक्ट IAS ऑफिसर होऊ शकता.

Software Technology क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी; सुरुवातीला 'हे' कराच

गंभीर असणं आवश्यक

UPSC परीक्षेची (UPSC Exam Preparation Tips) तयारी करताना तुमच्यासाठी गंभीर असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गंभीर नसाल किंवा तुमचं ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवत आहात. तुमच्या मेहनत आणि मेहनतीनेच तुम्ही यात यशस्वी होऊ शकता.

First published:

Tags: Career, Entrance Exams, Exam Fever 2022, Ias officer, Job, Jobs Exams, Upsc exam