• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • UPSC Results 2020: मोठ्या बहिणीला UPSC परीक्षेत तिसरी रँक तर लहान बहिणीला 21 वी रँक, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी

UPSC Results 2020: मोठ्या बहिणीला UPSC परीक्षेत तिसरी रँक तर लहान बहिणीला 21 वी रँक, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी

मुलं यशस्वी होण्यात त्यांच्या आई-वडिलांचं, कुटुंबाचं किती योगदान असतं आणि ते किती महत्त्वाचं असतं, हे जैन भगिनींच्या उदाहरणावरून कळतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवांच्या (IAS) 2020मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल (24 सप्टेंबर) जाहीर करण्यात आला. या परीक्षांचा निकाल जाहीर झाला, यशस्वी उमेदवारांच्या प्रेरक कहाण्या समोर येत असतात. कोणी खूप हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवलेलं असतं, तर कोणी ग्रामीण भागातून पुढे आलेलं असतं. या वर्षीच्या परीक्षेत 761 उमेदवार यशस्वी झाले असून, त्यापैकी 545 पुरुष, तर 216 महिला आहेत. देशात पहिलं येण्याचा मान बिहारच्या शुभम कुमार (Shubham Kumar) यांनी मिळवला असून, जागृती अवस्थी यांना दुसरा, तर दिल्लीच्या अंकिता जैन (Ankita Jain) यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अंकिता जैन यांची छोटी बहीण वैशाली जैन (Vaishali Jain) याही परीक्षेत यशस्वी झाल्या असून, त्यांना 21वी रँक मिळाली आहे. दोघी बहिणींनी एकाच वेळी यूपीएससीसारख्या अवघड परीक्षेत चांगली रँक मिळवणं ही दुर्मीळ गोष्ट त्यांनी आपल्या प्रयत्नांनी साध्य करून दाखवली आहे. या दोघींपैकी मोठी बहीण असलेल्या अंकिता यांनी 2018च्या आधीपासूनच यूपीएससीची तयारी सुरू केली होती. त्यामुळे धाकटी बहीण वैशाली यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या मार्गदर्शक ठरल्या. महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या अभिनव त्यागी (Abhinav Tyagi) यांच्याशी दोन महिन्यांपूर्वीच अंकिता यांचा विवाह झाला आणि त्या आग्र्याची सून बनल्या. सध्या अंकिता ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेसमध्ये मुंबईत कार्यरत आहेत. अंकिता यांचे वडील सुशीलकुमार जैन व्यावसायिक असून, त्यांची आई अनिता जैन गृहिणी आहेत. अंकिता यांचे बंधू सौरव जैन KPMGमध्ये मॅनेजर आहेत. Success Story: 'ती माझी नाही तर वडिलांची नोकरी...' बाबांच्या जागी काम करणाऱ्या मिन्नूने घडवला इतिहास अंकिता गेट परीक्षेतही देशभरात प्रथम आल्या होत्या आणि DRDOसाठी निवडल्या गेल्या होत्या. त्या वेळपासूनच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. पहिल्या प्रयत्नानंतर 2019मध्ये त्यांची IA&AS (Indian Audit and Accounts Service) बॅचसाठी निवड झाली होती; मात्र त्यावर त्या समाधानी नव्हत्या, म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केले. त्या वेळी मात्र त्या पूर्वपरीक्षेतही यशस्वी होऊ शकल्या नाहीत. कारण त्यांचा बहुतांश वेळ प्रशिक्षणातच जात होता. त्यानंतर आता तिसऱ्या वेळी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वेळेचं व्यवस्थापन करून तयारी सुरू केली. त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांना संपूर्ण सहकार्य मिळालं, जेणेकरून त्या जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देऊ शकतील. अपार मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासाचं फळ त्यांना मिळालं आणि या परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळालं. त्या देशात तिसऱ्या आल्या. Success Story: अवघ्या 21 वर्षांच्या वयात 'तिनं' क्रॅक केली UPSC परीक्षा; लातूरच्या लेकीनं उंचावली महाराष्ट्राची मान मुलं यशस्वी होण्यात त्यांच्या आई-वडिलांचं, कुटुंबाचं किती योगदान असतं आणि ते किती महत्त्वाचं असतं, हे जैन भगिनींच्या उदाहरणावरून कळतं. कारण अंकिता यांच्यासोबतच त्यांची धाकटी बहीण वैशाली यांनीही परीक्षेत 21वी रँक मिळवली. वैशाली सध्या संरक्षण मंत्रालयात IES अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बहिणीकडून त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी मिळाल्या. शिवाय त्यांचे आई-वडील या वाटचालीत प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत होते. मुलींना त्यांची उद्दिष्टं गाठण्यासाठी आई-वडिलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. दरम्यान, याआधी आयएएस झालेल्या टीना डाबी (Tina Dabi) यांची बहीण रिया डाबीदेखील (Riya Dabi) या वर्षी यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली असून, त्यांना 15वी रँक मिळाली आहे.
  First published: