UPSC Recruitment 2020 : 36 रिक्त पदांवर भरती सुरू, अर्ज करण्यासाठी 'ही' आहे अंतिम तारीख

UPSC Recruitment 2020 : 36 रिक्त पदांवर भरती सुरू, अर्ज करण्यासाठी 'ही' आहे अंतिम तारीख

कोरोना काळात नोकरी सोडली अथवा गेली आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : कोरोना काळात नोकरी सोडली अथवा गेली आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. UPSC द्वारे 36 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार यासाठी कसा अर्ज करू शकतात आणि पात्रता काय असेल याबाबत जाणून घ्या

UPSC द्वारे एकूण 36 रिक्त जागांसाठी भर्ती होणार आहे. प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये स्टॅटिस्टिकल ऑफिसर, लेजिस्लेटिव डिपार्टमेंटमध्ये सुपरिन्टेन्डेन्ट पदासाठी ही भर्ती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 17 डिसेंबरपर्यंत भरून द्यायचा आहे. 17 डिसेंबरनंतर उमेदवारांना अर्ज भरता येणार नाही.

शैक्षणिक पात्रता आणि अटी

यूपीएससी अंतर्गत सांख्यिकी अधिकारी 35 पदांवर नेमणूक करायची आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एका वर्षाच्या अनुभवासोबत Statistics / Operational Research / Mathematical Statistics / Applied Statistics या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. कमाल वय 30 वर्षे असावे.

हे वाचा-मुंबई IIT मधील प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्याला यश

तसेच अधीक्षक (मुद्रण) पदावर भरती होण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी देखील वयोमर्यादा 30 वर्षे देण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 12, 2020, 12:39 PM IST
Tags: upsc

ताज्या बातम्या