मुंबई, 26 डिसेंबर: नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या UPSC NDA परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची भारतीय सैन्याच्या तीनही शाखांसाठी प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. आता फॉर्म भरले जात असून त्यांच्या परीक्षा दोनदा होणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले तरुण मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पार करून भारतीय सैन्याचा महत्त्वाचा भाग बनतात. NDA 2023 च्या पहिल्या सत्राची अधिसूचना 21 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासोबतच ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहित देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया
असं करा अप्लाय
नोंदणीच्या वेळी दोन पर्याय दिसतील. भाग-एक आणि भाग-दोन. दिलेल्या सूचनांनुसार फॉर्म काळजीपूर्वक भरा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. नंतर त्यात सुधारणा करणे शक्य होणार नाही. सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे. विद्यार्थी ऑनलाइन डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ऑनलाइन बँकिंग आणि SBI चालानद्वारे देखील अर्जाची फी भरू शकतात.
ही पात्रता असणं आवश्यक
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. भूतान, नेपाळ आणि तिबेटी निर्वासित देखील अर्ज करू शकतात. भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने 1 जानेवारी 1962 पूर्वी आलेल्यांनाच ही सुविधा उपलब्ध असेल. श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, आफ्रिकन देश युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, युगांडा, झांबिया, झैरे, मलावी आणि इथिओपिया किंवा व्हिएतनाममधून येथे कायमचे स्थायिक होण्याच्या उद्देशाने स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
गुरखा वगळता सर्व परदेशी अर्जदारांना भारत सरकारने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या परीक्षेसाठी केवळ अविवाहित महिला/पुरुष अर्ज करू शकतात. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या आर्मी विंगसाठी, 12वी उत्तीर्ण किंवा सध्या 12वीत असलेले विद्यार्थी अर्ज भरू शकतात. हवाई दल आणि नौदलासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
AFCAT 2023: एअर फार्समध्ये ऑफिसर म्हणून जॉब हवाय ना? मग आताच करा रजिस्टर; उरले काही दिवस
अशी असेल वयोमर्यादा
2 जुलै 2004 नंतर आणि 1 जुलै 2007 पूर्वी जन्मलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. NDA-2023 भाग-II साठी वय: 2 जानेवारी 2005 नंतर आणि 1 जानेवारी 2008 पूर्वी जन्मलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Indian army, Jobs Exams, NDA, Upsc