Home /News /career /

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप यांची यशोगाथा; ASP ते IPS होण्याचा थक्क करणारा प्रवास

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुलदीप यांची यशोगाथा; ASP ते IPS होण्याचा थक्क करणारा प्रवास

चंदिगड पोलिसमध्ये (Chandigarh Police) असिस्टंट सब इंस्पेक्टर म्हणून काम करत असतानाच कुलदीप सिंह चहल (IPS Kuldeep Singh Chahal) यांनी UPSC परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास केली.

    दिल्ली,30 ऑगस्ट : युपीएससीच्या परीक्षेला (UPSC Exam) आपल्या देशभरामध्ये लाखो विद्यार्थी बसतात मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळतं. विविध राज्यातले विद्यार्थी या परीक्षेसाठी जय्यत तयारी करतात. काही विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नमध्ये यश मिळतं तर, काही विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा परीक्षा दिल्यानंतर यशाला गवसणी घालता येते. यश मिळाल्यानंतर सगळेच कौतुक करतात पण, यशापर्यंत पोहोचण्याचा रस्ता खडतर असतो. त्या खडतर रस्त्यावरचा प्रवास जिद्दीने करणारे लोकच आयुष्यामध्ये यशस्वी होतात. कुलदीप सिंह चहल (IPS Kuldeep Singh Chahal) यांचं आयुष्य लहानपणापासूनच संघर्षमय होतं. पण, त्यांनी कधीच हार मानली नाही, उलट जिद्दीने कठीण परिस्थितीचा सामना केला, UPSC परीक्षेसाठी प्रयत्न करताना काहीजणांना बारा-बारा तास अभ्यास करावा लागतो. तिच परीक्षा देण्यासाठी कुलदिप यांनी मात्र नोकरी सांभाळून अभ्यास केला. कुलदीप सिंह हरियाणाच्या जिंद जिल्ह्याच्या उझाना गावचे (Ujhana,Jind district of Haryana) राहणारे आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. (व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips) त्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमध्ये (Kurukshetra University) पुढील अभ्यास केला आणि पंजाब युनिव्हर्सिटी (Punjab University) म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अभ्यासाबरोबरच त्यांनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर चंदिगड पोलिसमध्ये (Chandigarh Police) असिस्टंट सब इंस्पेक्टर म्हणून रुजू झाले. त्यानंतर नोकरी करत असतानाच कुलदीप यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. (फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं) नोकरी सोडून फक्त अभ्यासावर फोकस करणं कुंलदिप यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरी करत अभ्यासाला वेळ द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच इतर परीक्षार्थ्यांपेक्षा कुलदीप यांना जास्त मेहनत करावी लागली. तरी त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही.  त्यांनी 2009 मध्ये UPSC परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास होत 82 रँक मिळवला. त्यानंतर IPS अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांनी त्यांच्या मेहनती आणि इमानदार स्वभावाने दबदबा निर्माण केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Inspiring story, IPS Officer, Success stories, Upsc exam

    पुढील बातम्या