नोकरी सांभाळून केला UPSC चा अभ्यास; कॉन्स्टेबल ते आयएएस ऑफिसर विजय सिंह गुर्जर यांच्या जिद्दीला सलाम

विजय सिंह गुर्जर यांचं बालपण एका खेडे गावात गेलं.

विजय सिंह गुर्जर (IAS Vijay Singh Gurjar) यांनी चांगली नोकरी मिळाल्यावरही अभ्यासाची साथ सोडली नाही. IAS ऑफिसर होण्यासाठी सतत मेहनत घेतली.

  • Share this:
    दिल्ली,21 जुलै :  प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात मात्र काही लोक प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या परिस्थितीला दोष देत राहतात. सगळ्या सोयी सुविधा असून देखील त्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोन (Negative View) ठेवून परिस्थितीला दोष देतात. पण काही लोक त्या परिस्थितीला आपली ताकद बनवतात आणि मेहनतीने (Hard work) आपलं नशीब बदलून दाखवतात. अशाच लोकांपैकी एक आहेत राजस्थानचे (Rajasthan) राहणारे विजय सिंह गुर्जर (IAS Vijay Singh Gurjar). विजय सिंह गुर्जर यांचं बालपण एका खेडे गावात गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्याच गावांमध्ये सरकारी शाळेत झालं. त्यांचे वडील शेतकरी आहेत. मुलांनी शिकून मोठं व्हावं असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. विजय यांनी त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. 2002 मध्ये त्यांनी दहावीची परिक्षा दिली. (बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही.) मात्र काही कारणास्तव त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला. पदवी मिळवल्यावर त्यांनी 2010 मध्ये दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळवली. मात्र आपलं शिक्षण सुरू ठेवलं. वेगवेगळ्या परीक्षा देत ते दिल्ली पोलीसमध्ये (Delhi Police) सब कॉन्स्टेबल पदापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी एसएससी (SSC) परीक्षा पास करून इन्कम टॅक्स डिपारमेंटमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. (कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना) इन्कम टॅक्स डिपार्मेंटमध्ये (Income Tax) नोकरी करत असताना ते यूपीएससीच(UPSC Exam)   अभ्यास करत होते. नोकरीमुळे त्यांना अभ्यासाला पूर्ण वेळ देता येत नव्हता मात्र, तरीही त्यांनी आपला ध्यास सोडला नाही. 2016 मध्ये विजय यांनी UPSC परीक्षा (UPSC Exam) पास केली. मात्र यावेळी इंटरव्यु राऊंड पार करता आला नाही. पुढल्यावर्षी 2017 मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि 574 रँक मिळवला. (जगातली सगळ्यात फिट महिला टिया क्लेयर टूमी; ‘हे’ आहे तिचं फिटनेस Secret) विजय यांच्या मते तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात, तिथलं वातावरण काय आहे. यापेक्षा तुमच्या मनात किती जिद्द आहे? आणि आलेल्या संकटावर मात करत शिक्षण घेण्याची इच्छा आहे का?  यावरच तुमचं यश अवलंबून असतं.
    Published by:News18 Desk
    First published: