मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

निधी सिवाच यांनी IAS ऑफिसर होण्यासाठी 6 महिने केलं स्वत:ला Lockdown; तिसरा प्रयत्न ठरला यशस्वी

निधी सिवाच यांनी IAS ऑफिसर होण्यासाठी 6 महिने केलं स्वत:ला Lockdown; तिसरा प्रयत्न ठरला यशस्वी

निधी सिवाच गुजरातमध्ये IAS ऑफिसर म्हणून काम करतात.

निधी सिवाच गुजरातमध्ये IAS ऑफिसर म्हणून काम करतात.

दोन प्रयत्न करूनही यश येत नसल्याने हताश न होता निधी सिवाच (IAS Officer Nidhi Siwach) यांनी 6 महिने घरात कोंडून घेत केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,18 जुलै :  मनात जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याचा धमक आहे आणि मेहनतीची तयारी आहे तर, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी (Difficult Life) देखील गपचूप मान खाली घालून निघून जातील. युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देशातली सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाते ही परीक्षा देऊन आयएएस (IAS Officer) होण्याचे स्वप्न देशांमधले अनेक विद्यार्थी पाहत असतात. काही विद्यार्थ्यांना अनेक वेळा प्रयत्न करूनही यश मिळालत नाही तर, काहींना पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं. आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षा (UPSC Exam) पास होऊन आयएएस अधिकारी (IAS Officer) बनता येतं. अशा कठोर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे आयएएस अधिकारी निधी सिवाच (IAS Officer Nidhi Siwach). सध्या गुजरातमध्ये IAS ऑफिसर म्हणून काम करतात.

(IIT ते IAS ऑफिसर प्रतिभा वर्मा यांच्या परिश्रमांचा प्रवास; तिसऱ्या प्रयत्नात मिळ)

निधी सिवाच या हरियाणाच्या गुरुग्राच्या राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत देखील त्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुणं मिळवले. बारावीनंतर त्यांनी इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं. हरियाणाच्या सोनीपत मधील दीनबंधू छोटुराम विश्व विद्यालयात त्यांनी इंजिनीअरिंग केलं. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या महिंद्रा टेकमध्ये डिझाईन इंजिनियर काम केलं.

(जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा)

पण,2017 त्यांनी आपली नोकरी सोडून UPSC ची परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. निधी सिवाच यांनी IAS बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून फक्त अभ्यास केला.दोन वेळा प्रयत्न करून त्यांना अपयश आलेलं होतं. त्यामुळे 2018 साली तिसरा प्रयत्न करताना त्यांनी 6 महिने सातत्याने अभ्यास केला आणि UPSC परीक्षा पास होऊन 83 रँक मिळवला.

(अंड आणि दूध एकत्र घेताय? तुम्हीच करताय स्वत:चं नुकसान)

UPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निधी यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्यांनी आली आवड असलेला विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडण्याचा सल्ला दिलेला आहे. निधी यांनी इतिहास हा ऑप्शन सब्जेक्ट निवडून नववी आणि दहावीच्या पुस्तकांचा अभ्यासाकरता वापर केला.

First published:

Tags: Ias officer, Inspiration, Inspiring story, Success stories