मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC साठी सोडली नोकरी; IAS श्रेयांश कुमत पहिल्याच प्रयत्नात टॉपर

UPSC साठी सोडली नोकरी; IAS श्रेयांश कुमत पहिल्याच प्रयत्नात टॉपर

IIT इंजिनियर असूनही आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS श्रेयांश कुमत यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

IIT इंजिनियर असूनही आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS श्रेयांश कुमत यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

IIT इंजिनियर असूनही आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IAS श्रेयांश कुमत यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : राजस्थानच्या अजमेर(Ajmer, Rajasthan) जिल्ह्यामध्ये किशनगड जिल्ह्यात राहणारे श्रेयांश कुमत (IAS Shreyansh Kumat) लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते. त्यांनी आयएएस ऑफिसर(IAS Officer)बनावं अशी त्यांच्या आजोबांची इच्छा होती. पण सुरवातीपासून सुरुवातीला श्रेयांश यांना इंजिनिअरिंगमध्ये (Engineering) रस होता. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेकडे (UPSC Exam) दुर्लक्ष केलं.

नंतर, कुटुंबाची मान उंचावण्यासाठी त्यांनी नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षेचा निर्णय घेतला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण अजमेरमध्ये (Ajmer) झालं. त्यानंतर बारावीचं शिक्षण त्यांनी कोटामध्ये घेतलं. यानंतर त्यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering,IIT Bombay) करून बीटेकची (B.Tech) डिग्री मिळवली.

(रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय)

त्यामुळे त्यांना चांगली नोकरी देखील मिळाली. कन्सल्टंट मॅनेजर (Consultant Manager) म्हणून नोकरी करताना त्यांच्या मनामध्ये यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार आला.

(धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं)

त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेतसाठी आवश्यक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि अभ्यासालाही सुरुवात केली. UPSCसाठी वेळ देता यावा यासाठी श्रेयांश यांनी नोकरी सोडली. अभ्यास करत असताना कोचिंग क्लासची मदत घेण्याचा विचारही त्यांच्या मनात आला. मात्र त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवत सेल्फ स्टडी आणि ऑनलाईन स्टडीवर फोकस केला.

(नीरज चोप्राची ‘फॅट-टू-फिट’ जर्नी तुम्हालाही करेल इन्सपायर)

ऑनलाईन स्टडीमुळे त्यांना विषय सखोल समजून घेण्यात फायदा झाला. श्रेयांश रोज 6 ते 10 तास अभ्यास करायचे यासाठी त्यांनी अभ्यासाचं शेड्युल तयार केलं. त्यांनी रिव्हिजन बरोबरच मॉक टेस्टचीही तयारी केली. त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे पहिल्याच प्रयत्नात 4था रँक मिळवला. त्यांना UPSC परीक्षेमध्ये एकूण 1071 मार्क मिळाले तर, मेन्समध्ये 887 आणि इंटरव्यू मध्ये 184 मार्क मिळाले.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc exam