मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IIT ग्रॅज्युएट ते IAS ऑफिसर; शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शिवम शर्मांनी सोडली परदेशी नोकरी

IIT ग्रॅज्युएट ते IAS ऑफिसर; शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शिवम शर्मांनी सोडली परदेशी नोकरी

शिवम शर्मा उत्तर प्रदेश आग्रामधले राहणारे आहेत.

शिवम शर्मा उत्तर प्रदेश आग्रामधले राहणारे आहेत.

IAS शिवम शर्मा (IAS Shivam Sharma) जपानमध्ये नोकरी करत होते. मात्र ती नोकरी सोडून ते भारतात परतले ते UPSCचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून.

नवी दिल्ली,06 जुलै : आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना अनेकांच्या आयुष्यामध्ये येतात. या घटनांमुळे आयुष्यात असे काही बदल होतात की आपली ओळख बदलून जाते. आयएस ऑफिसर शिवम शर्मा (IAS Shivam Sharma) यांनी देखील आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला. देशासाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने शिवम शर्मा जपानमधली आपली नोकरी सोडून देशात परत आले. त्यांनी UPSC परीक्षेचा (UPSC Exam) पर्याय निवडला प्रचंड मेहनत करून शिवम शर्मा यांनी 2  वेळा UPSCची परीक्षा दिली आणि IAS ऑफिसर बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.

शिवम शर्मा उत्तर प्रदेश आग्रामधले राहणारे आहेत.अभ्यासामध्ये अतिशय हुशार असलेले शिवम शर्मा यांनी IITमधून इंजीनियरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर प्लेसमेंट कंपनीकडूनच त्यांना नोकरीही मिळाली. मग काही वर्षे त्यांनी जपानमध्ये राहून नोकरी केली मात्र, भारतात परतून UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. जपान मधून परतल्यानंतर देखील त्यांनी एक मोठी कंपनी जॉईन केली होती. त्याच काळात त्यांना शेतकऱ्यांचं आयुष्य जवळून बघण्याची संधी मिळाली. तेव्हाच सिव्हिल सर्विसेसमधून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याकरता UPSC परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्यानंतर त्यांची इंडियन रेव्हेन्यु सर्विसमध्ये निवड करण्यात आली. शिवम शर्मा यांनी 2018 मध्ये पुन्हा परीक्षा देऊन ऑल इंडिया 125  रँक मिळवाला आणि आयएएस ऑफिसर बनण्याचा स्वप्न पूर्ण केलं.

शिवम शर्मा सांगतात, की UPSC परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर, प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. त्याकरता ऑप्श्नल सब्जेक्ट आपल्या आवडीचा विषय निवडण्यापेक्षा आपण ज्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळवू शकतो असा ऑप्श्नल विषय निवडावा असे ते म्हणतात. शिवम शर्मा यांनी सेल्फ स्टडी आणि नोट्स बनवण्याला जास्त महत्त्व दिलं आहे. ज्यामुळे परीक्षेआधी रिवीजन करता त्यांना पुरेसा वेळ मिळेल.

First published:
top videos

    Tags: Ias officer, Inspiring story, Success, Success stories, Success story