Home /News /career /

9 वेळा UPSC परीक्षा देऊन IAS झाले दृष्टीहीन बाला नागेंद्रन; डोळ्यात अंजन घालणारा प्रवास

9 वेळा UPSC परीक्षा देऊन IAS झाले दृष्टीहीन बाला नागेंद्रन; डोळ्यात अंजन घालणारा प्रवास

बाला नागेंद्र यांनी 2019 मध्ये UPSC सिव्हिल सेवा परीक्षा पास केली.

बाला नागेंद्र यांनी 2019 मध्ये UPSC सिव्हिल सेवा परीक्षा पास केली.

बाला नागेंद्रन यांची (Bala Nagendran) A ग्रेड सेवेसाठी निवड करण्यात आली. तरी, त्यांनी 2017 मध्ये पुन्हा एकदा UPSC सिव्हिल सर्विस परीक्षा (UPSC Civil Services Exam)दिली

    दिल्ली, 3 जुलै:आपल्या शरीरात कोणतेही व्यंग नसताना आपण कायम परिस्थितीला जबाबदार धरत अडचणींकडे बोट दाखवतो. अपयशाला आपण जबाबदार नसून आजूबाजूची परिस्थिती जबाबदार आहे असं म्हणून अंग झटकत असतो. मात्र, या जगात जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या अशा व्यक्ती आहेत ज्या स्वतःमधील कमतरतांनाही आपला प्लस पॉइंट मानतात. यापैकीच एक आहेत बाला नागेंद्र (IAS Bala Nagedran). बाला नागेंद्रन यांनी 2019 मध्ये UPSC सिव्हिल सेवा परीक्षा पास करत AIR 659 रँक मिळवला. बाला नागेंद्रन यांनी 2011 पासून सिविल सर्विस परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेच्या सुरुवातील अभ्यासाकरता ब्रेल लिपीमध्ये पुस्तक मिळवणं त्यांच्यासाठी कठीण होतं. त्यामुळे त्यांनी अभ्यासाची पुस्तकंच ब्रेल लिपीमध्ये तयार करून घेतली. 4 वर्ष सतत परीक्षा दिली. अपयश येत असूनही त्यांनी हार मानली नाही. (IIT ग्रॅज्युएट ऋषिकेश रेड्डींनी सोडलं नाही IAS चं स्वप्न; चार वेळा ठरले अपयशी पण) 2017 साली UPSC ग्रेड ए परीक्षा पास करत 927 रँक मिळवला. बाला यांची A ग्रेड सेवेसाठी निवड करण्यात आली. मात्र त्यांनी 2017 मध्ये पुन्हा एकदा UPSC सिव्हिल सर्विस परीक्षा दिली पण, केवळ एका गुणाने अपयश आलं नऊ वेळा प्रयत्न केल्यानंतर 2019 मध्ये IAS ऑफिसर झाले. त्यांनी 659 रँक मिळवत आपलं ध्येय पूर्ण केल. बाला नागेंद्रन IAS ऑफिसर आर्मस्ट्रॉंग पामे यांना आपला आदर्श मानतात. (इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय्) बाला सांगतात नेत्रहीनतेला मी कधीच कमजोरी मानलं नाही तर, व्यक्तिगत रूपात ही तर माझी ताकद आहे असं मी मानत होतो. दृष्टी नसल्यामुळे मला लोकांचं अलोकन जास्त चांगल्या प्रकारे करता येतं. या कमतरतेमुळेच मला स्वतःच्या आंतरिक दृष्टीची जाणीव झाली. (अपयश ही यशाची पहिली पायरी; UPSCच्या विद्यार्थ्यांना IPS अंकिता शर्मा यांचा खास स) बाला नागेंद्रन यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. जन्मापासूनच ते दिव्यांग होते. त्यांनी आपलं शालेय शिक्षण डिलिट फ्लॉवर कॉन्व्हेन्ट आणि रामकृष्ण मिशन स्कूलमध्ये (Ramakrishna Mission School) केलं. त्यानंतर चेन्नईमध्ये लॉयल आर कॉलेज (Loyal R College,Chennai) बीकॉम केलं. यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. शाळेपासूनच बाला अभ्यासामध्ये हुशार होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना IAS बनण्यासाठी प्रोत्साहित केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story

    पुढील बातम्या