मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Inspiration: 16 व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावणाऱ्या IAS सौम्या शर्मा पहिल्याच प्रयत्नात Topper

Inspiration: 16 व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावणाऱ्या IAS सौम्या शर्मा पहिल्याच प्रयत्नात Topper

सौम्या शर्मा यांना लहानपणापासूनच IAS अधिकारी होण्याची इच्छा होती.

सौम्या शर्मा यांना लहानपणापासूनच IAS अधिकारी होण्याची इच्छा होती.

‘हार्ड वर्क आणि टाईम मॅनेजमेंट’ करून UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याच स्वप्न पूर्ण करता येतं असं सौम्या शर्मा सांगतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशभरामध्ये लाखो विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेतचा (UPSC Exam)  अभ्यास करतात. त्यातील फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं. UPSC परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, अपार कष्ट करून या परीक्षेमध्ये विद्यार्थी यश मिळवत असतात. या विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी पाहिल्यानंतर खरोखरच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. काही विद्यार्थी दिव्यांग असून देखील या परीक्षेमध्ये यशस्वी होतात. अशाच व्यक्तींपैकी एक आहेत आयएएस अधिकारी सौम्या शर्मा (IAS Saumya Sharma). सौम्या शर्मा यांना लहानपणापासूनच IAS अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यांनी पहिल्याच प्रयत्नांमध्ये 9 रँक मिळवत आपलं स्वप्न पूर्ण केलं. पण, हा प्रवास सौम्या शर्मा यांच्यासाठी सोपा नव्हता.

16 वर्षाच्या असतानाच अचानक कमी ऐकायला लागलं. त्यांनी 90 ते 95 टक्के आपली ऐकण्याची क्षमता गमावलेली होती. याचं कारण डॉक्टरांकडून सुद्धा समजू शकलं नाही. पण, सौम्या शर्मा निराश झाल्या नाहीत.

त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. सोमय्या यांचं शिक्षण सुरुवातीला दिल्लीमध्ये (Delhi) झालं.

(हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य)

त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ स्कूलमध्ये (National School Of low) वकिलीचा अभ्यास सुरू केला. या दरम्यानच UPSC परीक्षा देण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी UPSCची परीक्षेची तयारी सुरू केली.

ऐकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सौम्या शर्मा यांना अभ्यासामध्ये देखील अडचणी आल्या. मात्र, त्यांनी अडचणींवर मात केली आणि सातत्याने अभ्यास करून यश मिळवलं. सौम्या शर्मा यांनी 2017 मध्ये UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. याच वर्षी परीक्षा देण्याचाही त्यांचा विचार होता.

(प्रेग्नन्सीत कोरडा खोकला ठरू शकतो धोकादायक; लगेच करा हे 5 उपाय)

मात्र, त्यांचा अभ्यास पूर्ण झाला नसल्यामुळे त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या. UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सौम्या शर्मा यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्या म्हणतात, “अभ्यास सुरू करण्याआधीच आपले सोर्सेस ठरवून घ्यायला हवेत. कारण एकाच ट्रॉपिकचा अभ्यास वेगवेगळ्या पुस्तकांमधून केल्यामुळे अभ्यासामध्ये जास्त वेळ जातो.

(15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास)

त्यामुळे पुस्तकांची निवड सुरुवातीपासूनच करून घ्यावी.” याशिवाय सौम्या यांनी नोट्स काढण्यावर जास्त भर दिलेला. त्यांच्यामते नोट्समुळे रिविजनला फायदा होतो. यामुळे कमी वेळात जास्त अभ्यासही करता येतो.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam