UPSC IAS परीक्षेसाठी कशी कराल तयारी; कशा पद्धतीनं विचारले जातात प्रश्न?

UPSC IAS परीक्षेसाठी कशी कराल तयारी; कशा पद्धतीनं विचारले जातात प्रश्न?

अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : UPSC परीक्षेची तयारी करणं म्हणजे जिद्द, मेहनत आणि जिकाटी हवी. आपली एक छोटी चूक आपल्याला सिलेक्शनपासून रोखू शकते. अशा वेळी आपण अति परफेक्ट असणं आणि तेवढ्या तोडीची तयारी करणं गरजेचं असतं. या परीक्षांना सामान्य़ ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज अत्यंत महत्त्वाचं असतं. चालू घडामोडी आणि मागच्या काही वर्षातील घडामोडींचे आताच्या घडीला उमटलेले पडसाद यांचा ताळमेळ साधून आपण कसं उत्तर देतो याला मुलाखतीमध्ये आणि परीक्षेत महत्त्व असतं. त्यामुळे अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास

देशभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर अभ्यास अगदी ती घटना काय होती इथपासून त्याचे सर्व स्तरावरील परिणाम आणि त्याची कारणं माहिती असायला हवीत. राजकारण, संस्कृती, समाजकारण, अर्थव्यवस्था, भूगोल या विषयांचा अभ्यास पक्का हवा. या विषयांमधील सर्व घडामोडी माहिती हव्यात. अगदी तोंडपाठ हव्यात.

हे वाचा-10वी- 12वी पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी, परीक्षा न घेता होणार निवड

आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती-

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागच्या 5 वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडी माहीत असायला हव्यात. भारत दौरे, पंतप्रधानांचे दौरे, त्याचे अपडेट्स, महत्त्वाचे करार, महत्त्वाचे प्रकल्प इत्यादी गोष्टींची माहिती हवी. जगभरातील महत्त्वाच्या समस्या, महत्त्वाच्या घटना, 5 वर्षांतील महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन आणि त्यांची माहिती. महत्त्वपूर्ण संस्था, करार आणि शाखांची माहिती, त्यांची कार्यपद्धती याचा अभ्यास असायला हवा.

भारताने किंवा भारताबरोबर इतर देशांचे असलेले करार आणि त्या कराराचा फायदा तो का केला याची कारणं य़ा सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे.

ही परीक्षा आणि मुलाखत दोन्ही इतकी हजरजबाबीपणे द्यावी लागते की तिथे आपल्या बुद्धीचा कसच लागतो. लाखो उमेदवारांमधून आपली निवड व्हावी यासाठी चौफेर अभ्यास आणि निरीक्षण क्षमता अधिक विकसित करणं गरजेचं असतं. मुलाखत आणि परीक्षेत एका मार्कानंही आपली संधी जाऊ शकते. त्यामुळे लेखी परीक्षेचा किंवा मुलाखतीचा अभ्यास करताना तो सर्वसमावेशच करायला हवा.

हे वाचा-भारतीय तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी उभी केली 71 हजार कोटींची कंपनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 08:27 AM IST

ताज्या बातम्या