मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IAS, IPS अधिकाऱ्यांना वेतन किती असतं? काय असतात जबाबदाऱ्या? वाचा सविस्तर

IAS, IPS अधिकाऱ्यांना वेतन किती असतं? काय असतात जबाबदाऱ्या? वाचा सविस्तर

अशी एका झटक्यात क्रॅक करा परीक्षा

अशी एका झटक्यात क्रॅक करा परीक्षा

देशात प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या दोन्ही विभागांचं काम एकमेकांना पूरक असंच असलं, तरी त्यांची पदरचना, पगार, जबाबदाऱ्या यात भरपूर फरक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी : कोणत्याही देशाचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी कुशल अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. त्याचवेळी देशाच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपल्या देशात प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या दोन्ही विभागांचं काम एकमेकांना पूरक असंच असलं, तरी त्यांची पदरचना, पगार, जबाबदाऱ्या यात भरपूर फरक आहे. या दोन्ही विभागांमधले काही महत्त्वाचे फरक जाणून घेऊ या.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत आयएएस आणि आयपीएस या दोन प्रमुख विभागांसाठी उमेदवार अर्ज करतात. या दोन्ही सेवा भारतात स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीपासून अस्तित्वात आहेत. देशाच्या विकासासाठी प्रशासकीय सेवांसोबतच सुरक्षाव्यवस्थाही तितकीच महत्त्वाची असते. या दोन्हीसाठी एकाच आयोगामार्फत परीक्षा घेतली जात असली, तरी या सेवांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. आयएएस आणि आयपीएस या दोन्ही सेवांसाठी नोकरभरती आणि बदली करण्यासाठी केडर कंट्रोलिंग ऑथॉरिटी असते. आयएएससाठी कार्मिक मंत्रालय हे काम सांभाळतं, तर आयपीएसचं काम गृह मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं.

जबाबदाऱ्या आणि अधिकार

आयएएस आणि आयपीएस या दोन्ही अधिकाऱ्यांना अनेक अधिकार मिळतात; मात्र आयएएस अधिकाऱ्यांचे अधिकार आयपीएसपेक्षा थोडे जास्त असतात. काही वर्षांच्या सेवेनंतर काही ठरावीक आयएएस अधिकाऱ्यांना जिल्हा दंडाधिकारी हे पद मिळतं. या पदावर असलेले अधिकारी जिल्ह्याच्या पातळीवरचे काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. तसंच कर्फ्यू वगैरेंसारखे पोलीस सेवेसाठीचे निर्णयही ते घेऊ शकतात. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीही जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. आयपीएस अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधीक्षक हे पद मिळू शकतं. त्या पदाकडे शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असते; मात्र काही वॉरंट्ससाठी त्यांना आयएएस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते.

हेही वाचा :Success Story : पाणीपुरी विकून मुलाला बनवले पायलट, रविकांतचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी!

वेतन

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर भारतातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली. या अधिकाऱ्यांना महिना 56 हजार 100 ते 2 लाख 25 हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन मिळतं. अनुभव आणि ज्येष्ठता यावरून ते कमी-जास्त असतं. आयएएस अधिकाऱ्यांचं वेतन 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजार रुपये प्रति महिना या श्रेणीत असतं. आयएएस अधिकाऱ्यांना आयपीएस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त वेतन असतं.

प्रमुख पदं

भारतीय नोकरशाही व्यवस्थेतलं उच्च पद अर्थात केंद्रातलं कॅबिनेट सचिव हे पद आयएएस अधिकाऱ्याला मिळू शकतं. राज्यातही अशाच प्रकारे कॅबिनेट सचिव पदाची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्याकडे येऊ शकते. केंद्रीय गृहसचिव पदही आयएएस अधिकाऱ्याला मिळू शकतं. आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचं पोलीस महासंचालकपद मिळू शकतं. तसंच हे अधिकारी केंद्रामध्ये सीबीआय, आयबी आणि रॉचे संचालक होऊ शकतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणूनही यांची नेमणूक होऊ शकते.

हेही वाचा : UPSC चे वेड, नापास झाल्यावर दिल्या 60 मॉक टेस्ट, अखेर तिने करुन दाखवलं!

आयएएस अधिकाऱ्यांना विशिष्ट पोशाखाचं बंधन नसतं, तर आयपीएस अधिकाऱ्यांना विशिष्ट पोशाख बंधनकारक असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या आयएएस आणि आयपीएस उमेदवारांना 3 महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इथं हे प्रशिक्षण दिलं जातं. 3 महिन्यांनंतर आयपीएस उमेदवारांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणात सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या आयएएस उमेदवाराला राष्ट्रपतींकडून सुवर्ण पदक मिळतं, तर आयपीएस अधिकाऱ्याला पंतप्रधानांच्या बॅटनमध्ये स्थान मिळतं. आयएएस आणि आयपीएस सेवा देशाचा विकास करण्यासाठी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी काम करत असतात.

First published:

Tags: Upsc, Upsc exam