मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC ESE 2023: इंजिनिअरिंग सेवा परीक्षेसाठी अर्ज केलात ना? घाई करा; उद्याची शेवटची तारीख

UPSC ESE 2023: इंजिनिअरिंग सेवा परीक्षेसाठी अर्ज केलात ना? घाई करा; उद्याची शेवटची तारीख

 UPSC ESE 2023

UPSC ESE 2023

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (UPSC ESE Recruitment 2023) अर्ज करायचा आहे, ते UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in च्या ऍप्लिकेशन पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 ऑक्टोबर: युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबर 2022 आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (UPSC ESE Recruitment 2023) अर्ज करायचा आहे, ते UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in च्या ऍप्लिकेशन पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 14 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मान्यताप्राप्त तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमधील BE/BTech उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 1 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

SSC Scientific Assistants Recruitment: 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांची भरती

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. तर महिला/SC/ST/PWBD यांना अर्ज शुल्क जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

UPSC ESE प्रीलिम्ससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे. यावेळी, वेळापत्रकानुसार, UPSC ESE प्रीलिम्स सर्व उमेदवारांसाठी 19 फेब्रुवारी 2023 रोजी होतील अशी माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. तसंच उमेदवाराकडे एक फोटो आयडी कार्ड उदा. आधार कार्ड/मतदार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/राज्य/केंद्र सरकारने जारी केलेले इतर कोणतेही फोटो आयडी कार्ड असणे आवश्यक आहे. याचा तपशील. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराला फोटो आयडी घ्यावा लागणार आहे.

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; पुण्यातील 'या' कॉलेजमध्ये ओपनिंग्स; लगेच पाठवा अर्ज

कार्यक्रमतपशील
UPSC ESE 2023 अधिसूचना14 सप्टेंबर 2022.
UPS ESE 2023 अर्ज प्रक्रिया सुरू14 सप्टेंबर 2022.
UPSC अभियांत्रिकी सेवांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख4 ऑक्टोबर 2022.
UPSC ESE प्रवेशपत्र 2023परीक्षेच्या 15-20 दिवस आधी रिलीज होण्याची शक्यता
UPSC ESE 2023 परीक्षेची तारीख19 फेब्रुवारी 2023.

असा करा अर्ज

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in ला भेट द्यावी.

यानंतर होम पेजवर अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 लिंकवर क्लिक करा.

UPSC ESE अर्ज फॉर्म लिंकसह एक नवीन पेज उघडेल.

स्वतःची नोंदणी करा आणि तपशील देऊन, कागदपत्रे अपलोड करून आणि फी भरून फॉर्म भरण्यास सुरुवात करा.

तुमचा UPSC ESE फॉर्म भरला जाईल.

सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भांसाठी एक कॉपी डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Upsc, Upsc exam