मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

लागा तयारीला! UPSC इंजिनिअरिंग सेवा परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; तब्बल 327 पदांसाठी होणार भरती

लागा तयारीला! UPSC इंजिनिअरिंग सेवा परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; तब्बल 327 पदांसाठी होणार भरती

 UPSC ESE 2023

UPSC ESE 2023

उमेदवार आता अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in वर अर्ज करू शकतात. मात्र यासाठी महत्वाच्या तारखा काय आहेत आणि अर्ज नक्की कसा करावा याबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 सप्टेंबर: केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC नं इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2023 ची अधिसूचना आज 14 सप्टेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीनं जारीं केली आहे. यासह, UPSC ESE अर्जाचे फॉर्मही जारी करण्यात आले आहेत. उमेदवार आता अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in वर अर्ज करू शकतात. मात्र यासाठी महत्वाच्या तारखा काय आहेत आणि अर्ज नक्की कसा करावा याबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

UPSC ESE प्रीलिम्ससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे. यावेळी, वेळापत्रकानुसार, UPSC ESE प्रीलिम्स सर्व उमेदवारांसाठी 19 फेब्रुवारी 2023 रोजी होतील अशी माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. तसंच उमेदवाराकडे एक फोटो आयडी कार्ड उदा. आधार कार्ड/मतदार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/राज्य/केंद्र सरकारने जारी केलेले इतर कोणतेही फोटो आयडी कार्ड असणे आवश्यक आहे. याचा तपशील. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराला फोटो आयडी घ्यावा लागणार आहे.

Career Tips: Law नंतर फक्त वकिलीच नाही तर 'हे' आहेत करिअर ऑपशन्स; मिळते सरकारी नोकरीही

काही महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतपशील
UPSC ESE 2023 अधिसूचना14 सप्टेंबर 2022.
UPS ESE 2023 अर्ज प्रक्रिया सुरू14 सप्टेंबर 2022.
UPSC अभियांत्रिकी सेवांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख4 ऑक्टोबर 2022.
UPSC ESE प्रवेशपत्र 2023परीक्षेच्या 15-20 दिवस आधी रिलीज होण्याची शक्यता
UPSC ESE 2023 परीक्षेची तारीख19 फेब्रुवारी 2023.

असा करा अर्ज

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in ला भेट द्यावी.

यानंतर होम पेजवर अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 लिंकवर क्लिक करा.

UPSC ESE अर्ज फॉर्म लिंकसह एक नवीन पेज उघडेल.

स्वतःची नोंदणी करा आणि तपशील देऊन, कागदपत्रे अपलोड करून आणि फी भरून फॉर्म भरण्यास सुरुवात करा.

तुमचा UPSC ESE फॉर्म भरला जाईल.

सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भांसाठी एक कॉपी डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

हे उमेदवार असतील पात्र

सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालेले उमेदवार हे या भरतीसाठी पात्र असणार आहेत. शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी UPSC ESE साठी वेळेवर अर्ज करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Exam Fever 2022, Jobs Exams, Upsc, Upsc exam