मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

 UPSC मुख्य परीक्षेची Admit Cards आता मिळणार , Download करण्यासाठी थेट जा या Link वर

 UPSC मुख्य परीक्षेची Admit Cards आता मिळणार , Download करण्यासाठी थेट जा या Link वर

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवाराने मास्क किंवा फेसशिल्ड वापरणं बंधनकारक असून, प्रत्येकानं स्वतःसोबत हँड सॅनिटायझरची छोटी बाटलीही आणावी, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 18 डिसेंबर: यूपीएससी (UPSC)  अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (Civil Services) विभागाच्या मुख्य परीक्षेची अ‍ॅडमिट कार्डस् आपल्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. जाहीर केलं आहे. यूपीएससीच्या Civil Servicesची पूर्वपरीक्षा (Prelim) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइटवरून IAS Mains 2020 या परीक्षेची अ‍ॅडमिट कार्डस् डाउनलोड करून घ्यावीत, असं आवाहन आयोगानं केलं आहे. ही परीक्षा म्हणजे या निवड प्रक्रियेचा पुढचा टप्पा आहे.

ही ई-अ‍ॅडमिट कार्डस् upsc.gov.in या वेबसाइटवरूनही डाउनलोड करता येतील, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. 8 ते 17 जानेवारी 2021 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवाराने मास्क किंवा फेसशिल्ड वापरणं बंधनकारक असून, प्रत्येकानं स्वतःसोबत हँड सॅनिटायझरची छोटी बाटलीही आणावी, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. तसंच, ओळख पटवण्याची गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्याने विचारल्यानंतर मास्क/फेसशिल्ड काढावा लागणार आहे. कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेता, परीक्षाकेंद्रावर येताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणंही अनिवार्य असेल.

ई-अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी...

  1. अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना upsc.gov.in किंवा upsconline.nic.in यांपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
  2. UPSCच्या होम पेजवरच्या 'What's New' या विभागात जावं. त्यानंतर ‘e-admit card: CSE (Main) exam’ ही अ‍ॅक्टिव्ह लिंक दिसेल.
  3. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल.
  4. सर्व सूचना बारकाईने वाचल्यावर 'Yes' या पर्यायावर क्लिक करावं.
  5. पुढच्या विंडोमध्ये गेल्यावर तुम्हाला साइन-इन क्रेडेन्शियल्स भरावी लागतील.
  6. कँडिडेट्स पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचे अ‍ॅडमिट कार्ड दिसेल.
  7. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्सच्या मेन्स परीक्षेचे (2020) ते ई-अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढा.

ई-अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची थेट लिंक अशी - https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csm_2020/instructions.php

नागरी सेवांसाठीची ही मुख्य परीक्षा म्हणजे दोन सत्रांत (Sessions) घेतली जाणारी लेखी परीक्षा (Written Test) असेल. सकाळी नऊ वाजता पहिले सत्र सुरू होऊन ते दुपारी संपेल. दुसरे सत्र दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत असेल.

या परीक्षेत उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार (Qualifying Candidates) मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरतील. मुलाखत हा प्रशासकीय सेवेमध्ये (Administrative Services) निवड होण्याच्या परीक्षा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो.

रिक्त पदांच्या तुलनेत दुप्पट उमेदवारांची लोकसेवा आयोगातर्फे अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना नंतर IAS, IPS, IFS, IRS आणि IRTS अशा रँक्सचे पर्याय दिले जातील.

First published:

Tags: Upsc exam