मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक

UPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक

UPPSC RO, ARO prelims 2020 ची उत्तरसूची पाहण्यासाठी त्यांच्या uppsc.up.nic या वेबसाईटवर क्लिक करा

UPPSC RO, ARO prelims 2020 ची उत्तरसूची पाहण्यासाठी त्यांच्या uppsc.up.nic या वेबसाईटवर क्लिक करा

UPPSC RO, ARO prelims 2020 ची उत्तरसूची पाहण्यासाठी त्यांच्या uppsc.up.nic या वेबसाईटवर क्लिक करा

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : UPPSC अर्थात, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या  वतीने घेण्यात आलेल्या RO, ARO  या दोन पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 20 सप्टेंबर 2020 ला झालेल्या पुनरावलोकन अधिकारी (Review Officer) आणि सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी ( Assistant Review Officer) या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची विद्यार्थ्यांना uppsc.up.nic.in. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील किंवा आक्षेप असतील तर ते देखील नोंदवू शकतात. 13 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 20 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी कोणतंही विशिष्ट कारण देण्यात आलं  नव्हतं.

परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व पेपर सेटच्या उत्तर सूची या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सूची डाउनलोड करून विद्यार्थ्यांनी पहाव्यात व ज्या विद्यार्थ्यांना उत्तर सूचींवर आक्षेप आहेत त्यांनी आपले आक्षेप पत्राद्वारे 28 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत UPPSC च्या ऑफिसला पाठवायचे आहेत. यामध्ये उत्तर सूचीच्या प्रिंटआउटबरोबर आवश्यक पुरावे देखील पत्राद्वारे पाठवणे गरजेचे आहे. सामान्य विज्ञान आणि हिंदी विषयाच्या या उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात आल्या असून 27 सप्टेंबरपर्यंत त्या वेबसाईटवर उपलब्ध असतील.

अशा प्रकारे तपासा उत्तर सूची

Step 1: uppsc.up.nic.in. या UPPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

Step 2: 'view Key Answer Sheet' या पर्यावावर क्लिक करा.

Step 3: त्यानंतर तुमच्या प्रश्नपत्रिका संचाची निवड करा. उदा. A /B /C /D

Step 4:  त्यानंतर तुमच्या संचाची उत्तर सूची वेबसाईटवर उपलब्ध होईल. भविष्यातील माहितीसाठी तुम्ही त्याची प्रिंट देखील काढून घेऊ शकता.

keywords :

First published:

Tags: Upsc exam