B.Sc. झालेल्यांना रेल्वेत व्हेकन्सी, 85 जागांवर भरती

B.Sc. झालेल्यांना रेल्वेत व्हेकन्सी, 85 जागांवर भरती

IRCTC Recruitment 2019 - रेल्वेत नोकरीची संधी आहे. त्याबद्दल घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 27 जुलै :  तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -

पद - पर्यवेक्षक ( हाॅस्पिटॅलिटी )

एकूण जागा - 85

शैक्षणिक पात्रता - B.Sc. (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन)  आणि 1 वर्ष अनुभव 

वयाची अट - 1 जुलै 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत पूर्ण हवं. SC/ST- 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

कचरा करणाऱ्यांना द्यावा लागणार जास्त टॅक्स, मोदी सरकारचा आहे 'हा' प्लॅन

अर्जाची फी नाही. नोकरीचं ठिकाण देशभरात असेल.

अधिक माहितीसाठी https://majhinaukri.in/irctc-recruitment/ इथे क्लिक करा.

मोदी सरकारची मोठी गिफ्ट, आता कार आणि बाइक होणार 'इतके' स्वस्त

स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी सोडण्याचा पर्याय ग्राहकांना आहे. तसाच आता रेल्वेच्या तिकिटांवरही लागू होणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरची गिव्ह इट अप योजना यशस्वी झाल्याचा दावा सरकारनं केलाय. त्यामुळे आता ऑनलाइनवर तिकीट बुक केलं तर प्रवाशांना त्यावरची सबसिडी सोडण्याची संधी मिळेल. सूत्रांच्या माहितीनुसार IRCTC च्या वेबसाइटवर तिकीट खरेदी करण्याच्या वेळी सबसिडी सोडण्याचा पर्याय दिला जाईल. तो घ्यायचा की नाही हे प्रवाशांवर अवलंबून आहे.

भारतीय प्रवाशांना रेल्वे तिकिटावर 47 टक्के सबसिडी देते. सबसिडीची भरपाई भाड्यातून केली जाते. यासाठी सोशल मीडिया, रेल्वे तिकिटाच्या मागे, ट्रेनच्या डब्यात आणि जाहिरातीद्वारे रेल्वे याबद्दल जागरुकता वाढवेल. ही स्कीम पुढच्या महिन्यापासून सुरू होऊ शकते.

ATM मधून फक्त पैसे नाहीत तर 'या' 8 सेवाही मोफत मिळतात

रेल्वे बोर्डाच्या चेअरमननं एका प्रोग्रॅममध्ये सांगितलं होतं की प्रवाशांच्या तिकीट भाड्यात रेल्वेचं नुकसानच होतंय. अगोदर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत सोडण्याचा पर्याय दिला होता. त्यात 40 लाख ज्येष्ठ नागरिकांनी सबसिडी सोडली होती. यामुळे रेल्वेला जवळजवळ 78 कोटींचा फायदा झाला.

कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: July 27, 2019, 6:58 PM IST
Tags: jobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading