मुंबई, 06 ऑगस्ट : तुम्हाला लिहायला आवडतं? तुम्ही चांगलं लिहू शकता? असं असेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग लेखनाची संधी आहे. नेटफ्लिक्सला लेखक हवे आहेत. लेखक Meryl Alpe यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर याबद्दल माहिती दिलीय. त्यांनी लिहिलंय की नेटफ्लिक्सला फ्रीलान्सर लेखक हवेत, ज्यांना हिंदू देवता, पौराणिक कथा आणि भारतीय संस्कृती यांचं ज्ञान आहे.
त्यांनी लिहिलंय, या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला लहान मुलांविषयीच्या लेखनाचा अनुभव हवा. छोट्या मुलांच्या लेखनाचा अनुभव हवा. तुम्हाला हे जमत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.
LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे
असा हवा अनुभव
टीव्ही सीरिजच्या लेखनाचा अनुभव हवा
लहान मुलाचं लेखन करण्याचा अनुभव हवा
याशिवाय डायलाॅग, व्यक्तिरेखा डेव्हलपमेंट आणि एंटरटेन्मेंटमध्ये लेखनाचं सँपल हवं
SBI नं ग्राहकांना केलं सावध, तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' करायलाच हवं
ही असेल जबाबदारी
छोट्या मुलांना रस वाटेल असं सांस्कृतिक आणि पौराणिक लेखन
11 मिनिटाच्या अॅनिमेटेड एपिसोडसाठी स्प्रिंगबोर्ड, परिसर, रूपरेखा आणि स्क्रिप्ट लिहिणं
लाॅस एन्जलिसच्या टीमबरोबर मीटिंगसाठी उपस्थिती ( व्हिडिओ काॅन्फरन्सिंग किंवा फोन )
अॅनिमेशनमध्ये क्रिएटिव्ह कामाची माहिती
ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करायची क्षमता
नेटफ्लिक्स वेगवेगळ्या प्रकारच्या सीरिज तयार करत असते. आता लहान मुलांच्या सीरिजचा प्लॅन नेटफ्लिक्स करतंय. त्यासाठीच त्यांना लेखकांची गरज आहे.
लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव
दरम्यान,Netflix वरील 2018 मध्ये आलेला सिनेमा लस्ट स्टोरीजच्या यशानंतर निर्माता करण जोहर, झोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा एकत्र येत नव्या सिनेमाची तयारी सुरू केली आहे. लस्ट स्टोरीजनंतर यावेळी ते घोस्ट स्टोरीज अर्थात भूतांच्या गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार प्रत्येक दिग्दर्शक आपप्लाय स्टोरीचं स्वतंत्र शूट करणार असून त्यानंतर हे सर्व एकत्र नेटफ्लिक्सवर रिलीज केलं जाईल. ‘घोस्ट स्टोरीज’ हे नेटफ्लिक्स आणि SRVP यांच्यातील एकत्र असा तिसरा प्रोजेक्ट आहे. घोस्ट स्टोरीजचं प्रोडक्शन रॉनी स्क्रुवाला आणि SRVP करणार आहेत.
निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं याबाबत ट्विटरवर लिहिलं, ‘आम्ही चौघंही पुन्हा एकदा तुमच्यासाठी काहीतरी नवं घेऊन येण्यासाठी तयार झालो आहोत. #GhostStories लवकरच नेटफ्लिक्सवर तुमच्या भेटीला येत आहे.’
VIDEO '...आणि हे मंत्री नाचतायत'; महाजनांच्या जल्लोषावर अजित पवारांची बोचरी टीका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा