पदवीधरांना मुंबई हाय कोर्टात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

पदवीधरांना मुंबई हाय कोर्टात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

Bombay High Court Recruitment - न्यायव्यवस्थेत काम करण्याची चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : तुम्ही नोकरी शोधताय का? मग नागपूरला खंडपिठात संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात 204 जागांवर भरती आहे. क्लार्क आणि शिपाई पदासाठी ही व्हेकन्सी आहे.

पद आणि पद संख्या

क्लार्क पदासाठी 128 जागांवर व्हेकन्सी आहे. तर शिपाई पदासाठी 76 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

क्लार्क पदासाठी पदवीधर आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे. तसंच MS-CIT किंवा समतुल्य शिक्षण हवं.

SBI Alert : तुमच्या बँक अकाउंटमधून अशी होऊ शकते चोरी!

वयाची मर्यादा

उमेदवाराचं वय 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत हवं.  मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे.

अर्जाची फी

क्लार्क पदासाठी 10 रुपये आणि शिपाई पदासाठी 50 रुपये आहे.

नोकरीचं ठिकाण नागपूर आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2019 आहे.

'या' नोकरीत मिळणार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार, 'असा' करा अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/ इथे क्लिक करा.

तसंच, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत अकोला इथे अनेक पदांवर भरती सुरू होत आहे. अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन/लेखा सहाय्यक या पदांवर ही व्हेकन्सी आहे. एकूण जागा 73 आहेत.

पोस्ट ऑफिस सुरू करतेय 'ही' नवी सुविधा, घरबसल्या मिळतील फायदे

अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन/लेखा सहाय्यक या पदांसाठी जिल्हा अभियान कक्ष आणि तालुका अभियान कक्ष इथे काम करावं लागेल.

अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर यांना टायपिंग येणं आवश्यक आहे.

वयाची अट - 26 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत हवं. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट आहे.

अर्जाची फी - खुला वर्ग - 374 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 274 रुपये आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://akolamsrlm.padbharti.com इथे क्लिक करा.

MumbaiRains : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाचा भाग कोसळला, लोकल सेवेवर मोठा परिणाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 3, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading