मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Union Budget 2023: देशात तब्बल 38,800 शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा; कधी होईल नियुक्ती

Union Budget 2023: देशात तब्बल 38,800 शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा; कधी होईल नियुक्ती

कधी होणार नियुक्त्या? मोठी अपडेट आली समोर

कधी होणार नियुक्त्या? मोठी अपडेट आली समोर

केंद्र एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी तब्बल 38,800 शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या दिशेने काम करणार आहे. पण या नियुक्त्या कधी आणि कशा होणार आहेत याबद्दल जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी: 2023 चा अर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या सादरीकरणादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की अमृत कालच्या पहिल्या अर्थसंकल्पातील मुख्य केंद्रांपैकी एक म्हणजे रोजगार निर्मिती आणि तरुणांसाठी संधी. म्हणूनच रोजगार निर्मिती आणि नोकऱ्या निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल म्हणून, केंद्र एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी तब्बल 38,800 शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या दिशेने काम करणार आहे. पण या नियुक्त्या कधी आणि कशा होणार आहेत याबद्दल जाणून घेऊया.

केंद्र सरकार ज्या कर्मचारी आणि शालेय शिक्षकांची भरती करणार आहेअसे कर्मचारी पुढील 3 वर्षात नियुक्त केले जाणार आहेत. तसंच हे शिक्षक आणि शालेय कर्मचारी हे तब्बल 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सेवा देणार आहेत. एकलव्य शाळा दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देतात. 2022 मध्ये 50% पेक्षा जास्त एसटी लोकसंख्या असलेल्या आणि किमान 20,000 आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येतं.

Education Budget 2023: शिक्षण मंत्रालय झालं मालामाल; शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाला किती कोटी? वाचा माहिती

कशी होणार भरती

शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांची ही भरती 740 विद्यमान एकलव्य मॉडेल स्कूलसाठी केली जाणार आहे. इथे सध्या 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सेवा देण्यात येत आहे तर ही भरती झाल्यानंतर अजून आदिवासी विद्यार्थ्यांना यामध्ये शिक्षण मिळू शकणार आहे.

बजेटमधील इतर महत्त्वाच्या घोषणा

शिक्षण आणि मेडिकल क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी देशात काही मुख्य ठिकाणी तब्बल 157 नर्सिंग कॉलेजेस उघडण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड स्थापन केला जाईल, शेतकऱ्यांच्या आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण आणि परवडणारे उपाय आणेल, नफा वाढवेल आणि आधुनिक तंत्रज्ञान आणेल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

ना जॉबचं टेन्शन ना बॉसचं प्रेशर; असे घरबसल्या कमवा तासाचे लाखो रुपये

मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी भौगोलिक, भाषा, शैली आणि स्तरांवरील दर्जेदार पुस्तकांची सोय करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल अशीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

तरुणांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी... प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 पुढील 3 वर्षांत लाखो तरुणांना कौशल्य देण्यासाठी सुरू केले जाईल अशी सीतारामन यांनी घोषणा केली, तसंच देशातील 30 राज्यांमध्ये कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रं सुरु करण्यात येतील अशीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Career Tips: महिन्याला मिळेल लाखोंमध्ये सॅलरी; 'हा' कोर्स शून्यातून वर घेऊन जाईल तुमचं करिअर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नॅशनल चाइल्ड ट्रस्ट, चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि इतर स्त्रोतांना या ग्रंथालयांना प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीमध्ये अभ्यासक्रमेतर शीर्षके प्रदान करण्यासाठी आणि पुन्हा भरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल; साक्षरतेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबतही सहकार्य केलं जाईल अशे घोषणा करण्यात आली आहे.

First published:

Tags: Budget 2023, Career, Career opportunities, Jobs Exams, Nirmala Sitharaman, Union Budget 2023