मुंबई, 06 जानेवारी: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट परीक्षेतील वयोमर्यादेबाबत एक अतिशय महत्त्वाची सूचना जारी केली आहे. हे NET JRF परीक्षेतील वयोमर्यादा कमी करण्याबाबत आहे. NTA च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. UGC NET JRF वयोमर्यादेत काय बदल आहे? आता UGC NET वयोमर्यादा किती असेल? हे सर्व प्रश्न आता तुम्हालाही पडले असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
2023 मध्ये होणाऱ्या UGC NET डिसेंबर 2022 च्या परीक्षेच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नवीन नियमानुसारच अर्ज भरावे लागणार आहेत. तो नियम काय आहे माहित आहे?
NET JRF वयोमर्यादा काय असेल?
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार, डिसेंबर 2022 च्या NET परीक्षेची उच्च वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. यापूर्वी 29 डिसेंबर 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ संशोधन फेलोशिप म्हणजेच JRF साठीची उच्च वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत मोजली जाणार होती. मात्र आता ती 1 डिसेंबर 2022 पर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजे तीन महिने कमी.
जॉब मिळत नाहीये? मोबाईलमधील FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ; लगेच मिळेल नोकरी
जेआरएफची परीक्षा देणार्या उमेदवारांनाच हा निर्णय लागू असेल. कारण NET परीक्षेत कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही (केवळ असिस्टंट प्रोफेसर). आता 1 डिसेंबर 2022 नंतर ज्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त आहे, ते JRF परीक्षेसाठी पात्र असणार नाहीत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच सवलत दिली जाईल. परंतु त्यांची कमाल वयोमर्यादा देखील 1 डिसेंबर 2022 च्या सुधारित कटऑफ तारखेपर्यंत गणली जाईल.
वयोमर्यादेबाबत हा निर्णय का घेण्यात आला?
नोटिसमध्ये, NTA ने म्हटले आहे की 'केवळ काही उमेदवारांनी UGC ला विनंती पाठवली आहे की JRF साठी उच्च वयोमर्यादा मोजण्याची अंतिम तारीख सुधारली जावी. यावर विचार केल्यानंतर, यूजीसीच्या नेट ब्युरोने 2 जानेवारी रोजी एनटीएला वयोमर्यादेच्या कटऑफ तारखेत सुधारणा करण्यासंदर्भात पत्र पाठवले. ज्याच्या आधारावर NTA ने हा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Jobs Exams