मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर; अशी होणार परीक्षा

UGC NET 2021: NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर; अशी होणार परीक्षा

UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे

UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे

UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आणि जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाला त्यामुळे दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी घेण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या UGC NET (UGC NET Exam date) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

डिसेंबर 2020 सत्र परीक्षा आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र केली गेली आहे. आता दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे. फी भरण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2021 आहे. उमेदवार 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतील.

हे वाचा - सुवर्णसंधी! Coal इंडियामध्ये तब्बल 588 जागांसाठी होणार मेगाभरती; या जागा रिक्त

यापूर्वी डिसेंबर 2020 सत्राची UGC NET परीक्षा 2 मे ते 17 मे 2021 दरम्यान होणार होती. UGC NET डिसेंबर 2020 साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये आयोजित केली गेली. असे उमेदवार ज्यांनी UGC NET डिसेंबर 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे परंतु अर्ज पूर्णपणे सादर करू शकले नाहीत ते https://ugcnet.nta.nic.in, www.nta.ac.in ला भेट देऊन अर्ज पूर्ण करू शकतात.

या कालावधीत होणार परीक्षा

6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. ही परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपरमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील.

First published:

Tags: Career opportunities, Education, Exam