सागर, 10 मार्च : लग्नानंतर अनेक महिला संसाराच्या जबाबदारीत अडकल्यावर करिअर राहुन जाते. मात्र, काही महिला लग्नानंतरही आपले करिअर नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून घडवतात. आज आम्हीच अशाच एका महिलेची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी रेकॉर्ड केला.
दोन मुले, कुटुंबाची जबाबदारी, वय वर्षे 40, पोलिसांची नोकरी, तब्येतीची ओढ आणि मग पॉवर लिफ्टिंगचा असा ध्यास की त्यांनी राज्य चॅम्पियन होऊन सुवर्णपदक पटकावले. जवाहरलाल नेहरू पोलीस अकादमी, सागरमध्ये वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त केलेल्या सुभेदार रश्मी रावत यांनी ही विक्रम केलाय.
ज्या वयात स्त्रिया सहसा थकून घरी बसतात, त्या वयात नवनवीन विक्रम करणाऱ्या रश्मी रावत यांच्याकडून इतर लोकही प्रेरणा घेऊ शकतात. कुटुंबाची जबाबदारी आणि पोलिसांच्या नोकरीतील कर्तव्ये पार पाडणे याच्या दरम्यान लहानपणापासूनचा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी असे नियोजन केले की, त्यांना कशातही कधीच अडचण येत नाही.
तिरुपतीपुरम, सागर येथे राहणाऱ्या 40 वर्षीय रश्मी रावत यांना 2013 मध्ये सुभेदार पदाची नोकरी मिळाली. सर्व काही ठीक चालले होते, कोरोनानंतर त्यांनी उत्तम आरोग्यासाठी जिम जॉईन केले. येथे त्यांना डिस्ट्रिक्ट पावर लिफ्टिंगबाबत माहिती मिळाली. यानंतर त्यात त्यांनी भाग घेतला.
दोनवेळा त्यांनी जिल्हास्तरावर स्पर्धा जिंकली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली. मध्य प्रदेश पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने इंदूर येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी 152 किलो गटात सुवर्णपदक जिंकून आपल्या कुटुंबाचे, विभागाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
रश्मी यांची कथा जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण लग्नानंतर, परिस्थितीमुळे स्त्रियांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत किंवा स्वतःच स्वप्न पाहणे सोडून देतात. पण इथे रश्मी यांच्या बाबतीत असे काही घडले की, त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबाने त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.
रश्मीला लहानपणापासून राष्ट्रीय खेळ खेळण्याची इच्छा होती. पण अभ्यास, नंतर लग्न आणि नंतर नोकरीमुळे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र, आता राज्यानंतर त्यांना राष्ट्रीय खेळाची संधी मिळणार आहे.
रश्मी रावत काय म्हणतात -
जर परिस्थिती योग्य असेल तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल, असे त्या म्हणतात. तसेच इतर महिलांसाठी त्या म्हणतात की, जर तुम्ही स्वप्न पाहाल तर ते पूर्ण होऊ शकतात, स्वतःसाठीही वेळ कुठूनतरी बाहेर येते. जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर ते असेच राहते, म्हणून कधीही हार मानू नका, तुमचे ध्येय समोर ठेवा आणि त्यादिशेने प्रयत्न करत राहा, असा सल्लाही त्या देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiring story, Local18, Madhya pradesh, Success story, The woman