Home /News /career /

जुळ्या भावांची कमाल; चेहऱ्याप्रमाणे नोकरीचं पॅकेजही मिळालं सारखंच; आकडा बघून व्हाल थक्क

जुळ्या भावांची कमाल; चेहऱ्याप्रमाणे नोकरीचं पॅकेजही मिळालं सारखंच; आकडा बघून व्हाल थक्क

त्यांच्या अगदी हुबेहुब चेहऱ्याप्रमाणेच नोकरीही सारखीच मिळाली आहे.

    नवी दिल्ली, 01 जुलै: सलमान खानचा 'जुडवा' हा सिनेमा आठवतो का? या सिनेमात दोन जुळे भाऊ असतात दिसायलाही सारखेच असतात आणि एकाबरोबर जे होईल तेच दुसऱ्याबरोबरही घडत असतं. मात्र खऱ्या आयुष्यात असं काही होणं अशक्य आहे. पण याला अपवाद ठरलेत पश्चिम बंगालमधील (West Bengal) दोन भाऊ. या जुळ्या भावांच्या (Twin Brothers) बाबतीत हे घडलंय असंच म्हणावं लागेल. कारण या दोघांनाही त्यांच्या अगदी हुबेहुब चेहऱ्याप्रमाणेच नोकरीही सारखीच मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांचं पॅकेजही  (Highest salary package) सारखंच आहे. सप्तर्षी आणि राजर्षी मजूमदार असं या जुळ्या भावांचं नाव आहे. आंध्र प्रदेशातील (AP) एसआरएम विद्यापीठातून (SRM University) नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. या दोघांनाही गुगल जपानच्या स्ट्रॅटेजिक पदावर (PVP Inc, a strategic partner of Google Japan) नोकरी लागली आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही सारखंच तब्बल 50 लाख प्रतिवर्षांचं पॅकेज मिळालं आहे. त्यांना हा जॉब कॅम्पस प्लेसमेंटमधून (Campus Placement) मिळाला आहे. आंध्र प्रदेशातून ग्रॅज्युएट होणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांपेक्षा आतापर्यन्त सर्वाधिक पगार या दोघांना मिळाला आहे. हे वाचा - काय सांगता! लस घेतली नाही तर तुमची पगारवाढ येऊ शकते धोक्यात; प्रमोशनवरही परिणाम “आमच्या वडिलांच्या जॉब पोस्टिंगमुळे आम्ही आमचं बालपण झारखंडमध्ये (Jharkhand) घालवलं. आम्ही आमची शाळा अंशतः बोकारो स्टील सिटी आणि अंशतः देवघर इथे केली आणि बोकारो स्टील सिटीमध्ये हायस्कूल शिकलो. मग आम्ही एसआरएम एपी इथे आलो आणि कम्प्युटर सायन्सचा  (Computer science)अभ्यास केला. आमचे वडील हॉटेलचे जनरल मॅनेजर आहेत. आमची आई गृहिणी आहे," अशी माहिती 22 वर्षांच्या या दोन भावांनी दिली. SRM च्या पहिल्या बॅचचं वार्षिक पॅकेज 7 लाख रुपये होतं. मात्र या जोडीला सर्वाधिक पॅकेज मिळालं आहे. विद्यापीठानंही त्यांच्या कर्तृत्वाबद्दल या जुळ्या मुलांचा सत्कार केला आहे. एसआरएमएपीचे कुलगुरू, प्रा. व्ही. एस. राव यांनी त्यांना प्रत्येकी दोन लाखांचे रोख बक्षीस दिलं आहे. या भावंडांचं हे यश म्हणजे फक्त एसआरएमसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानची गोष्ट आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Google, Job, Success story, West bangal

    पुढील बातम्या