मराठी बातम्या /बातम्या /करिअर /अबब! जुळ्या बहिणींचे 12 वीचे गुणही Same to Same; कुटुंबीयही झाले चाट

अबब! जुळ्या बहिणींचे 12 वीचे गुणही Same to Same; कुटुंबीयही झाले चाट

आम्हाला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती...सारख्या नाही

आम्हाला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती...सारख्या नाही

आम्हाला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती...सारख्या नाही

नवी दिल्ली, 15 जुलै : उद्या महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीएससीचाही निकाल समोर आला आहे. त्यामुळे सध्या देशभरात कोरोनासह निकालांचा काळ सुरू आहे.

त्यातच सीबीएससी बोर्डाच्या बारावीला निकाल समोर आला आहे. येथे जुळ्या बहिणींनी सारखेच गुण मिळाल्याने सर्वजण चाट झाले आहे. ग्रेटर नोएडमध्ये राहणाऱ्या मानसी व मान्या यांना बारावीत 95.8 टक्के गुण मिळाले आहे.

दोघींनाही सारखे गुण मिळाल्याने सर्वजण चाट पडले आहेत. यावर मानसी म्हणाली की- या निकालामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. आम्हाला चांगल्या मार्काची अपेक्षा होती..सारख्या नाही..विशेष म्हणजे या दोघींनी सर्व 5 विषयांमध्ये सारखे गुण मिळाले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra state board) बोर्डाचे बारावीचे निकाल (class xii results) उद्या म्हणजे 16 जुलैला (HSC result 2020) जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल. Coronavirus च्या संसर्गामुळे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. पण बारावीचे मात्र सगळे पेपर साथीच्या प्रादुर्भावाअगोदर आणि लॉकडाऊनपूर्वीच झाले होते. उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं.

First published:
top videos