• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • लोकांनी हिणवलं, टोमणेही दिले; पण दुर्लक्ष करत तिनं ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन

लोकांनी हिणवलं, टोमणेही दिले; पण दुर्लक्ष करत तिनं ध्येय गाठलंच; पोलीस अधिकारी झाली ही ट्रान्सवुमन

जिद्दीच्या बळावर आपलं स्वप्न साकार करणारी तीस वर्षीय ट्रान्सवुमन (Transwoman) एस. शिवन्या (S. Shivanya) हिने समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. पोलीस सेवेत दाखल होणारी ती तिरुवन्नमलाई जिल्ह्यातली पहिली ट्रान्सवुमन आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 31 जुलै : आजही आपल्या समाजात तृतीयपंथी (Transgenders) व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचितच आहे. आजही या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहजासहजी मानाचं स्थान मिळत नाही. त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. त्यांची कुचेष्टा, हेटाळणी केली जाते. समाजातून मिळणाऱ्या अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करत अत्यंत जिद्दीनं काही ट्रान्सजेंडर्सनी आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात अशा व्यक्तींचं मोलाचं योगदान मिळत आहे. जिद्दीच्या बळावर आपलं स्वप्न साकार करणारी तीस वर्षीय ट्रान्सवुमन (Transwoman) एस. शिवन्या (S. Shivanya) हिनेदेखील समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. पोलीस सेवेत दाखल होणारी ती तिरुवन्नमलाई जिल्ह्यातली पहिली ट्रान्सवुमन आहे. 'दी न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एस. शिवन्या हिची तमिळनाडू पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी (SI) निवड झाली असून, नुकतेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री (Tamil Nadu CM) एम. के. स्टालिन (M. K. Stalin) यांच्या हस्ते तिला नियुक्तीचे आदेश मिळाले. तिरुवन्नमलाईतल्या पावुपट्टू गावातल्या शिवन्यानं समाजाकडून मिळणाऱ्या तुच्छतेच्या वागणुकीकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत हे यश साध्य केलं. आपल्या या यशात आपले आई-वडील, कुटुंबीय यांचा मोठा हातभार असल्याचं ती कृतज्ञतापूर्वक सांगते. तिचे आई-वडील आणि भाऊ यांनी तिला नेहमी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. तिचा मोठा भाऊ स्टालिन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे, तर लहान भाऊ तमिळनिधी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक 'मला माझ्या आनंदाचं वर्णन करता येणं अशक्य आहे. सगळ्या अडचणींकडे दुर्लक्ष करून मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलं, चिकाटीनं तयारी करत राहिले त्याचंच हे फळ मला मिळालं आहे,' अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या परीक्षेसाठी तयारी करण्याआधी ती तिरुवन्नमलाईच्या जिल्हा न्यायालयात (District Court) ‘पॅरा लीगल व्हॉलंटियर’ म्हणून काम करत होती. तमिळनाडूची पहिली ट्रान्सवुमन एसआय (Tamil Nadu’s First Transwoman SI) प्रीथिका याशिनी ही (Prithika Yashini) सरकारी नोकरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या ट्रान्सवुमन्ससाठी आदर्श आहे. शिवन्यानंही तिचाच आदर्श ठेवला होता. ‘पोलीस सेवेत दाखल होऊन तिनं मिळवलेलं यश आम्हाला आमच्या महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सर्व अडचणींशी लढण्याचं बळ देतं,’ असं शिवन्यानं सांगितलं. शिक्षण घेतलेल्या ट्रान्सवुमनला कुटुंब आणि समाजाकडून मदत मिळाली तर तीदेखील चांगली नोकरी मिळवू शकते आणि चांगलं जीवन जगू शकते, असा विश्वास शिवन्यानं व्यक्त केला. IIT शशांक मिश्रांनी IASसाठी सोडली अमेरिकेची नोकरी; ट्रेन प्रवासात केला अभ्यास कोरोना साथीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) शारीरिक, वैद्यकीय चाचण्या आणि मुलाखतीची प्रक्रिया लांबल्यानं कॉमर्समधल्या पदवीधरांना दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे शिवन्यालाही तिच्या नियुक्तीची औपचारिकता पूर्ण होण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. आता टीएनपीएससीची (TNPSC) प्रथम श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण होऊन डीएसपी बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.
First published: