मराठी बातम्या /बातम्या /करिअर /एका तासाचे 700 रूपये? या क्षेत्रात करिअर कराल तर घरबसल्या कमवाल लाखो रुपये

एका तासाचे 700 रूपये? या क्षेत्रात करिअर कराल तर घरबसल्या कमवाल लाखो रुपये

काम अवघा 1 तास आणि पैसे 700 रुपये

काम अवघा 1 तास आणि पैसे 700 रुपये

आज आम्ही तुम्हाला अशा एका करिअरबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त एक तास काम करून तब्बल 600-700 रुपये कमावू शकता तेही घरबसल्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 जानेवारी: आजकालच्या काळात तेच तेच कॉमन जॉब करण्यापेक्षा तरुणांना ऑफबीट करिअर करण्यात जास्त रस आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण नऊ ते पाच नोकरी करूनही जितके पैसे मिळू शकत नाहीत त्याहून अधिक पैसे ऑफबीट करिअरच्या माध्यमातून कमावता येतात. त्यात अशा करिअरमध्ये कोणाचं बंधन नाही की रोकटोक नाही. आपल्या मर्जीनुसार कामही करता येतं. म्हणूनच आता विद्यार्थ्यांचा आर्टस् कडे कल वाढला आहे. तुम्हालाहेअशा ऑफबीट क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका करिअरबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त एक तास काम करून तब्बल 600-700 रुपये कमावू शकता तेही घरबसल्या. चला तर मग जाणून घेऊया.

IAF Agniveer Admit Card 2023: परीक्षेच्या तारखांची घोषणा; कधी आणि कसं डाउनलोड कराल प्रवेशपत्रं? बघा स्टेप्स

इंग्लिश ही  जगात बोलली जाणारी सर्वात मोठी भाषा बनत चालली आहे. क्षेत्रं कुठलंही असो आता इंग्लिशशिवाय जगाला पर्याय नाही. पण ही इंग्रजी जगातील प्रत्येक व्यक्तीला येतेच असं नाही. त्यामुळे इंग्लिशमधून सर्वांना समजेल अशा स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणं खूप महत्त्वाचं असतं. हा काम करण्याचं काम करतात ट्रान्सलेटर्स. अगदी सरकारी डॉक्युमेंट्स असू देत की सामान्य लेख प्रत्येक क्षेत्रात ट्रांसलेटर्सची गरज असतेच. म्हणून या क्षेत्राला संपूर्ण जगात मान्यता मिळू लागली लागली आहे.

या क्षेत्राची विशेष बाब म्हणजे कुठलंही काळ, वेळ, ठिकाण आणि एकाच कुठल्या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक नाही. या क्षेत्रात तुम्ही घरबसल्याही काम करू शकता. काही लोक यामध्ये फिलांसींग करतात तर काही लोकं फुल टाइम ट्रांसलेटर म्हणणं जॉब करतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्याकडे काय शिक्षण आणि काय स्किल्स असणं आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

खूशखबर..खूशखबर! राज्यातील 10वी पास तरुणांना सेंट्रल रेल्वे देणार मोठ्ठं गिफ्ट; तब्ब्ल 2422 जागांसाठी भरती; करा अप्लाय

पदवीशिवायही होता येतं ट्रांसलेटर

पदवीशिवाय अनुवादक होण्यासाठी लागणारा वेळ अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही फील्डमध्ये अनुभव मिळवून अनुवादक बनण्याची योजना आखत असाल, तर हे करण्यासाठी तुम्हाला काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. तुम्ही प्रमाणपत्रे मिळवून अनुवादक बनण्याचा विचार करत असल्यास, आवश्यक परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कितीही वेळ लागू शकतो.

ट्रान्सलेटर्सला कुठे मिळते नोकरी किंवा कामं

ट्रांसलेटर म्हणून काम करताना कोणत्याही डिग्रीची गरज नसते. फक्त तुमच्याकडे आवश्यक ते भाषांचं ज्ञान आवश्यक आहे. तुम्ही ट्रांसलेशन्सचं काम फ्रिलांसींगने करू शकता. यासाठी बऱ्याच फ्रिलांसींग वेबसाईट्स उपलब्ध आहेत. तसंच तुमि कोणत्या सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू शकता जिथे ट्रांसलेटर्सची गरज असेल.

किती असते कमाई

साधारणतः एका अनुभवी ट्रान्स्लेटरला किमान तासाला 600-700 रुपये कमावता येतात. अर्थात यामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे हे महत्त्वाचं असतं. एका फ्रेशर ट्रान्स लेटरला किमान 100-200 रुपायी तासाला किंवा दोन तासाला मिळू शकतात. काही पुस्तकं आणि नॉव्हेल्स ट्रान्सलेट करणारे लोकं लाखो रुपये शुल्क घेतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Job