• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • काय? 90 दिवसांमध्ये Tech Mahindra च्या तब्बल 21% कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा; Attrition Rate टीसीएसच्या दुप्पट

काय? 90 दिवसांमध्ये Tech Mahindra च्या तब्बल 21% कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा; Attrition Rate टीसीएसच्या दुप्पट

90 दिवसांमध्ये Tech Mahindra च्या तब्बल 21% कर्मचाऱ्यांनी राजीनामा (Tech Mahindra Attrition Rate) दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर: TCS, Infosys, Wipro अशा काही IT कंपन्या कोरोनाकाळातही नफ्यात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारातही बऱ्याच कंपन्यांनी वाढ (Salary Hike of IT companies) केली. असं असतानाही या वर्षीच्या शेवट्पर्यंत तब्बल 10 लाख IT कर्मचारी त्यांचे जॉब सोडतील (10 lacs IT employees leave jobs) असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षीच्या Attrition Rate (Attrition Rate in IT Sector) (कर्मचारी जॉब सोडून जाणे) मध्येही दरवर्षीपेक्षा अधिक वाढ (Why Attrition Rate increased in 2021) होणार आहे असा अंदाज लावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कदायक बाब समोर आली आहे. 90 दिवसांमध्ये Tech Mahindra च्या तब्बल 21% कर्मचाऱ्यांनी राजीनामा (Tech Mahindra Attrition Rate) दिला आहे. इतर प्रमुख IT कंपन्यांच्या तुलनेत टेक महिंद्राचा अॅट्रिशन रेट जास्त आहे. तसेच कंपन्या वरिष्ठ कर्मचार्‍यांना मुख्यत्वे कौशल्याचा पुरवठा आणि मागणी यासाठी जास्त भरपाई देत आहेत. अलीकडेच इन्फोसिस आणि विप्रोचे या तिमाहीत सर्वाधिक LTM अट्रिशन दर अनुक्रमे 20.1 टक्के आणि 20.5 टक्के होते. TCS ने गेल्या बारा महिन्यांतील सर्वात कमी त्रैमासिक अॅट्रिशन रेट 11.9 टक्के वाढवला आहे. मात्र या सर्वांपेक्षा Tech Mahindra चा अट्रिशन रेट सर्वाधिक आहे. यासंबंधीचं वृत्त 'ट्रेक.इन' नं प्रसिद्ध केलं आहे. क्या बात है! भारताची 'ही' मोठी कंपनी कायम सुरु ठेवणार Work From Home; कर्मचाऱ्यांना असणार चॉईस कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार कर्मचारी निघून जात आहेत आणि बहुतांश टियर-1 शहरांतील आहेत, आणि त्यामुळे अ‍ॅट्रिशन रेट सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. टेक महिंद्राने हे प्रकरण आधीच गांभीर्याने घेतले आहे; कर्मचार्‍यांना राहण्यासाठी त्यांनी व्यापक स्तरावर वाढ, पदोन्नती आणि धारणा प्रोत्साहन योजना आखल्या आहेत. TCS च्या दुप्पट Attrition Rate विशेष म्हणजे Tech Mahindra कंपनीचा यंदाचा Attrition Rate हा TCS च्या दुप्पट आहे. त्यामुळे कंपनीला नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: