मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Top Schools in MH: पालकांनो, तुमच्या पाल्यांसाठी 'या' आहेत कोल्हापुरातील टॉप 5 Schools; वाचा संपूर्ण माहिती

Top Schools in MH: पालकांनो, तुमच्या पाल्यांसाठी 'या' आहेत कोल्हापुरातील टॉप 5 Schools; वाचा संपूर्ण माहिती

कोल्हापूर शहरातील टॉप 5 शाळा

कोल्हापूर शहरातील टॉप 5 शाळा

आज आम्ही तुम्हाला कोल्हापूर शहरातील टॉप 5 शाळा (Top 5 CBSE schools in Kolhapur List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
कोल्हापूर, 24 मार्च: फेब्रुवारी आणि मार्च महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला कोल्हापूर शहरातील टॉप 5 शाळा (Top 5 CBSE schools in Kolhapur List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Kolhapur) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best CBSE schools in Kolhapur). 1. माई साहेब बावडेकर शाळा कोल्हापूर या शाळेच्या संस्थापिका श्रीमंत माईसाहेब बावडेकर यांच्या नावावर या शाळेला नाव देण्यात आलं आहे. या शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासह इतरही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात. या शाळेत इंग्लिश आणि मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय आहे. शाळॆत शिक्षक, पर्यवेक्षक, अभ्यासक्रम नियोजक आणि शिक्षक प्रशिक्षकांची मेहनती टीम आहे. त्यामुळे ही शाळा कोल्हापुरातील काही टॉप शाळांपैकी एक आहे. माई साहेब बावडेकर शाळा कोल्हापूर
माई साहेब बावडेकर शाळा कोल्हापूर
माई साहेब बावडेकर शाळा कोल्हापूरमाहिती
शाळेचा पत्ता25 Kh, E प्रभाग, समोर. आयकर कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर-416003
शाळेचा फोन क्रमांक(0231) 265 1516, 266 5748  9561609062
शाळेचा ई-मेल आयडीsmbschool@yahoo.com
वेबसाईटhttp://www.maisahebbavdekarschool.com/index.html
2. प्रायव्हेट हायस्कुल कोल्हापूर ही शाळा मराठी माध्यमाची शाळा म्हणून सुरू झाली. आज, ते इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी माध्यमातही शिक्षण देते. खाजगी उच्च माध्यमिक शाळा खाजगी शिक्षण संस्थेद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. शाळा 10वी पर्यंत मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमात आहे. ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागांतर्गत येते. संस्थेची मुख्य शाखा आदर्शपणे कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे; उपनगरीय लोकसंख्येच्या सहज प्रवेशासह. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सोयीस्कर वेळेसह उपलब्ध आहे. प्रायव्हेट हायस्कुल कोल्हापूर
प्रायव्हेट हायस्कुल कोल्हापूर
प्रायव्हेट हायस्कुल कोल्हापूरमाहिती
शाळेचा पत्ता  खाजगी शिक्षण संस्था, कोल्हापूर. 2560, बी, खासबाग, कोल्हापूर - 416012.
शाळेचा फोन क्रमांक+91 231 2642444
शाळेचा ई-मेल आयडी -
वेबसाईटhttp://privateedukolhapur.com/index.html
3. शांतिनिकेतन स्कुल कोल्हापूर आमचा विश्वास आहे की शिक्षणामध्ये 3 'R' पेक्षा जास्त आहे; वाचन, लेखन आणि अंकगणित. खऱ्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि चारित्र्याचा शरीर, मन आणि आत्मा यांचा सर्वांगीण विकास होतो असं शाळेच्या व्हिजनमध्ये आहे. ही शाळा कोलाहपुरातील CBSE शाळा आहे. अभ्यासक्रम हा डिजिटल सपोर्टसह विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाचा अनोखा मिलाफ आहे. हे प्रायोगिक-आधारित शिक्षणाचे अनुसरण करते जे संकल्पना स्पष्टता एकत्रित करते आणि विस्तारित शिक्षण आणि संज्ञानात्मक विकासासाठी संधी प्रदान करते. शांतिनिकेतन स्कुल कोल्हापूर
शांतिनिकेतन स्कुल कोल्हापूर
शांतिनिकेतन स्कुल कोल्हापूर माहिती
शाळेचा पत्ताR.S. क्र. 134 ई, शिवाजी विद्यापीठाजवळ, मोरेवाडी, कोल्हापूर-416004
शाळेचा फोन क्रमांक+918055533382 / +918055533384
शाळेचा ई-मेल आयडीinfo@shantiniketankop.edu.in
वेबसाईटhttp://shantiniketankop.edu.in/
4. कोल्हापूर पब्लिक स्कुल या शाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितासाठी विशेष प्रयोगशाळा., इंग्रजी भाषा प्रयोगशाळा., अत्याधुनिक संगणकांसह संगणक प्रयोगशाळा. आहेत. तसंच विद्यार्थ्यांना जलतरण तलाव, विशेष लाकडी बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल मैदान, क्रिकेट खेळपट्टी या सुविधाही देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातील CBSE शाळा आहे. या शाळेत मराठी हा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन विषय आहे. कोल्हापूर पब्लिक स्कुल
कोल्हापूर पब्लिक स्कुल
कोल्हापूर पब्लिक स्कुलमाहिती
शाळेचा पत्ताR.S.No.576, राजेंद्र नगर पाण्याच्या टाकीजवळ, राजेंद्र नगर, कोल्हापूर, महाराष्ट्र. 416013
शाळेचा फोन क्रमांक 0231-2695143
शाळेचा ई-मेल आयडी kpskop@yahoo.com | shobhatawde1957@gmail.com
वेबसाईटhttps://kpsedu.org/index.php
5. पोदार इंटरनॅशनल स्कूल पोदार हे आज एक विश्वासार्ह नाव आहे आणि भारतातील सर्वोच्च शाळांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आपल्या मुलांचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्याच्या सामूहिक प्रयत्नात एक मान्यताप्राप्त नाव आहे. पोदार स्कुल हे देशभरात सर्वत्र आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर सोयो सुविधाही प्रदान केल्या जातात. तसंच विद्याथ्यांना स्पोर्ट्समध्ये अग्रेसर बनवण्यात येतं.
पोदार इंटरनॅशनल स्कूलमाहिती
शाळेचा पत्ता1032, 'अ' प्रभाग, नवीन वाशी नाका, रिंग रोड, म्हाडा कॉलनीजवळ, कोल्हापूर - 416012. महाराष्ट्र.
शाळेचा फोन क्रमांक 6366437865
शाळेचा ई-मेल आयडीadmissions@podar.org
वेबसाईटhttps://www.podareducation.org/school/kolhapur
महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सदर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.
First published:

Tags: Career, Education, Kolhapur, School, Top Schools in Maharashtra

पुढील बातम्या