• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Infosys Reskilling: इन्फोसिसनं देशातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स केले जाहीर; इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Infosys Reskilling: इन्फोसिसनं देशातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स केले जाहीर; इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

विद्यार्थ्यांना कंपनीकडून ऑनलाईन शिक्षण (Infosys Reskilling) दिलं जाणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 संप्टेंबर: देशातील टॉप आयटी कंपनी इन्फोसिसनं (Infosys IT company) आपल्या डिजिटल विस्तारासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचसाठी आता कंपनीनं देशातील विद्यार्थ्यांना Online कोर्सच्या  (Infosys Online course) माध्यमातून स्किलफुल (Reskilling) बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 'Reskilling' असं या उपक्रमाचं नाव आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीकडून ऑनलाईन शिक्षण (Infosys Reskilling) दिलं जाणार आहे. या उपक्रमांतर्गत इन्फोसिस कंपनी 2025 पर्यंत 10 दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढवण्याची योजना आखत आहे . इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड (Infosys Springboard) अंतर्गत कौशल्य 6 व्या वर्गापासून ते आजीवन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या औपचारिक शिक्षणासह उत्कृष्ट आणि कॉर्पोरेट दर्जाचं शिक्षण दिलं जाणार आहे. कॉलेज, प्रौढ, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांपासून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल रीस्कीलिंगला गती देणं हा याचा हेतू असणार आहे. हे वाचा - भारीच! फक्त Ice Cream खा आणि मिळवा भरघोस पगार; टेस्ट टेस्टर म्हणजे म्हणजे काय? हा अभ्यासक्रम भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (National Education Policy 2020) शी जुळला आहे ज्यात मुलांसाठी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना सराव क्षेत्र, प्रोग्रामिंग, मास्टरक्लासेस आणि प्रयोगांसाठी खेळाची प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना यासाठी व्हर्च्युअल प्रोक्टर्ड परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. जर ते उत्तीर्ण झाले तर प्रमाणपत्र मिळणार आहे. इन्फोसिस स्प्रिंगबोर्डमध्ये स्वयंसेवी संस्था, 300+ शिक्षण संस्था आणि 400,000 विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी स्किलफुल होण्याची ही सर्वात मोठी संधी असणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: